हाची आदि हाची अंत
हयाच्या समोर मी नतमस्तक
हा सांभाळतो बाळापरी
देवांचाही देव माझा गणराज गणपती
हाच मला देतो शक्ती, बुध्दी, ज्ञान सारे काही
हयाचा आशिर्वाद हीच, माझी या जगीची पुण्याई
फक्त एक माझी इच्छा, कृपा हयाची राहो पुरती
देवांचाही देव माझा गणराज गणपती
देवेंद्र हा महाबळी,कल्याणकारी आम्हां प्रती
सांभाळतो,रक्षितो,अभय देतो कल्याणकारी
महाराष्ट्री अष्टविनायक, हयाचा महिमा सर्वत्र
देवांचाही देव माझा गणराज गणपती
तूच कर्ताआणि करविता,तूच विश्वाचा निर्माता
तूच सगुण , तूच करतो रक्षण
तुझ्याठायी जागते, सर्वदेवांचे एकपण
देवांही देव माझा गणराज गणपती
चतुर्थला मंगल दिवस
ध्यान करून जे पूजत
विघनेश्रर कृपा करती, भक्त आनंदती
देवांही देव माझा गणराज गणपती
सौ.मीना उल्हास करकरे.
Kommentare