- Vishwa Marathi Parishad
फक्त देवाचा भक्त!

देशात चहूकडे उठले गोंधळाचे रान आहे
झापड प्रजा विवेक विचाराची वानवा आहे
दांभिकता धर्म कळस डोळस वृत्ती अभाव आहे
प्रजा बेहाल अंधभक्त विपुल देवपण बहाल आहे
आकस आरोप प्रत्यारोप अहंता वितुष्टवाद आहे
निष्ठा व्यस्त स्वार्थ जास्त साथ सहकार्य वर्ज्य आहे
भरकटला समाज देश निराशा तिमिर आहे
तेजोकिरण पथदर्शक मार्गदर्शक शोध आहे
अवतारी विभूति संत युगपुरूष पुण्यभूमि आहे
फक्त देवाचा भक्त प्रकाशमय उद्याची आस आहे!
नावः प्रकाश र. पटृणकर
मोबाईल ९४२७४४४६२४
पुरूष वय वर्षे ६८
वडोदरा, गुजरात
Email.: pattankarp@gmail.com
ब्लॉगवर नवीन आहात ? नवीन ब्लॉगपोस्टच्या सुचना ईमेलवर येण्यासाठी सबस्क्राईब करा
386 views0 comments