जीव मुठीत धरुनी करी संकटावर मात
ठायी ठायी संघर्ष दिसे त्याच्या जीवनात
दुःखाचा डोंगर उभा या देहाच्या भवती
तीळतीळ मन तुटते पाहुनी तुझी स्थिती
झुंज तुझी काळाशी आहेत मोठ्या धैर्याची
उंबरठ्यात येऊन धडकते हि रात्र वैर्याची
निराश मन तुझे आणते मरणाच्या दारी
वाट पाहतात लेकरे पावले घेना माघारी
प्रवास तुझा खडतर होईल त्याचा शेवट
सावर तू कुटुंबास जाईल काळाचे सावट
नजरेत तुझ्या दिसु दे सुखाचे आभाळ
मागतो मागणं देवा दूर होऊ दे दुष्काळ
मागतो मागणं देवा दूर होऊ दे दुष्काळ.
अक्षय तेजाळे.
नं: 9673717091
Email: akshaytejale@gmail.com
ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Comments