मराठी माणुस म्हटलं की साहाजीकच महाराष्ट्र आला आणि महाराष्ट्र म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा राजा शिवाजी!!!ज्याचे नाव उच्चारले तरी त्याचे शौर्य आठवून अंगावर शाहारा आल्याशिवाय राहात नाही. आपण आपल्या ह्या लाडक्या राजाला सहसा एकेरी संबोधतो, जस आपण आपल्या आईला संबोधतो. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा महाराष्ट्रतातच, भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात अतुलनीय, अद्वितीय, अलौकिक, अविस्मरणीय असा दुसरा राजा नाही. ह्या आपल्या आवडत्या राजाने नेहमीच स्त्रीयांचा सन्मान केला. प्रत्येक यथस्वी पूरूषामागे एक स्री असते, हे हि जिजामाता आणि शिवाजीच्या गोष्टीतून आपल्या लक्षात येत. धत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत जगदंबा. त्यांची तुळाजाभवानीवरील भक्ती नेहमीच जगदंबा हया त्यांच्या शब्दात जाणवत आली आहे.
तुळजापूरची जगदंबा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठतील एक आदिशक्ती. तूळाजाभवानीची प्रतिमा महिषासूरमर्दिनिच्या रूपातील आहे. आईची अनेक रूप आहेत, त्यातलेच हे एक अद्भुतरम्य रूप. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात सुखकर्ता दु:खकर्ता ह्या गणपतीच्या आरती नंतर हमखास म्हटली जाणारी आरती, दुर्गे दुघट भारी ही ह्याच महिषासूरमर्दिनिवर नरहरि यांनी लिहीली आहे. जनमानसात, देशात, परदेशात आज हीच आरती मोठ्या भक्ती भावाने गायली जाते.
महिषासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने ब्रम्हदेवाची भक्ती करून वर प्राप्त केला होता की, कोणताही देव अथवा दानव त्याला मारू शकणार नाही. ह्याच वरामुळे त्याने तिन्ही लोकांत धुमाकूळ घातला होता आणि त्याचाच वध करण्यासाठी आदिशक्ती पार्वतीने नवे रूप धारण केले ते दुर्गा. दुर्गा, शस्त्रधारीणी, शस्त्रांची देवता, अंकुश, त्रिशुळ, परशु, वज्र, ध्वज हातात सामावलेली रौद्र रूप धारण केलेली शक्तीशाली, तेजस्विनी, मनमोहिनी, महिषासूरमर्दिनि. तिच्या हातातली ही आयुधे तिचे शौर्य दर्शवितात. अनादी काळापासून स्री किती धाडसी आणि बुद्धीमान होती हे दर्शवितात. द्रृष्टाचा नाश करून सुख, शांती आणि समृद्धी पसरविणारी, देविदुर्गा, जगदंबा अंब अंबा!!
एखाद्या संकटाचा शय होणे हे सहज शक्य नाही असे आढळून आले कि, त्या वेळेस ह्या दुर्गा देवीची प्रार्थना करतात आणि ती तिच्या भक्तांना कधीच निराश करत नाही. स्री रूपातील दुर्गा आदिशक्तीच आहे, तर तीचा अंश असलेली प्रत्येक स्री ही शिक्तीचच रूप असणार आहे. एखादी स्री जर कठीण प्रसंगातून जात असेल, तर तीने स्वतःला सांगाव कि माझ्यात दुर्गेचा अंश आहे, मी दुबळी नाही. आणि पुरुषानेही स्रीच्या अस्तित्वाचा सन्मान कराव. कारण ती आहे म्हणून तुम्ही आहात.
लेडिज फस्ट हा नियमही विधात्यानेच घालुन दिला असेल कारण जेव्हा सृष्टीची निर्माती झाली तेव्हा नक्कीच देवाने स्रीला आधी बनवल असेल आणि पुरुषाच अस्तित्व तीच्यानंतर नऊ महिन्याने सुरू झाल असेल. ती नसती तर पुरुषाच आयुष्यही बेरंगी झाल असत, अगदी त्या black and white टेलीविजन सारखं. ती रंगाची चाहती आहे. तीच्यात शृंगार रस कुटकूटुन भरला आहे. ती आहे म्हणून हळद कुंकु यांना महत्त्व आहे. ती आहे म्हणूनच दागिणे आहेत. ती आहे म्हणून कारुण्य आणि तारूण्य यांचा अर्थ आहे. ती आहे म्हणून वात्सल्य आहे. संसार आहे आणि त्यात विवधता आहे. ती म्हणजे वात्सल्य, मांगल्य, मातृत्व, कतृत्व, तीच दुर्गा, तीच लक्ष्मी, तीच सरस्वती. ती आहे म्हणून घर आहे, स्वयंपाक आहे, ती आहे म्हणून नाती आहेत आणि त्या नात्याना मायेची ओढ आहे.
हो मगाशी म्हटलं खरं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्री असते, पण आज प्रत्येक यशस्वी स्री मागे एक महात्मा पुरुष आहे, "जोतिबा फुले". आज स्री शिकली प्रगती झाली. सावित्री झाली, मदर टेरेसा झाली. आकाशालाही स्पर्शुन आली....कल्पना चावला झाली, सुनिता विल्यम झाली, सायना नेहवाल झाली, मेरी कोम झाली. स्रीने प्रगती केली, पुरुषांनेही केली का? आजही काही पुरुषांमध्ये पशूच अस्तित्व अजुनही जागृत आहे. त्यामुळेच आकाशाला गवसणी घालणारी ती स्री मात्र रस्त्यावर भयभीत आहे. हाथरस हे त्याचेच उदाहरण आहे. स्री मृक्त संचार करू शकत नाही, पण जी सिंहारूढ आहे.....जगत जननी आहे....तीला कोणालाच घाबरण्याची गरज नाही आहे. कारण आयुष्यरूपी चित्रपट हा नायीका प्रधान आहे आणि त्या चित्रपटाची नायिका तुच आहेस. असे किती महिषासूर आले आणि गेले देवीचाच जयघोष झाला. अंबेचा जय असो.
गितकार शांताराम आठले यांच्या शब्दात सांगायचे झाले तर....
मन सुध्द तुझी गोष्ट हाय
पृथ्वी मोलाची तु चाल पुढ
तुला ग भीती कशाची
पर्वा बी कोणाची!!!!
नरहरी यांनी स्री रूपात असलेल्या शक्तीची...अनादि काळात केलेली दुर्गेची आरती आणि अर्थ.
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारीं जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
अर्थ: हे दुर्गे देवी दुर्घट( दुर्घटना) तूझ्या वाजुन संसाररूपी संकट तरून जाण्यास कठीण आहे. हे अनाथानंची नाथ, अंब, अंबा, जगदंबा तुझ्या करूणेचा विस्तार कर. आम्हाच्यावर कृपा कर. तीन वारी..तीन्ही लोकातुन मला आता शांती मिळवी. अध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक असे जे तीन ताप आहेत त्यातून तु आता माझी सुटका कर. माझ्या मार्गात ताप(संकट) येणारे अडथळे तु आता दुर कर देवी. मी पराभूत झालो आहे. हया जन्ममरणाच्या जक्ररातुन मला मृक्ती प्रदान कर. मोक्ष प्रदान कर. !!1!!
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
अर्थ: देवीचा जयघोष असो. महिषासूरास मारून हे देवी तु सर्वांस अभय दिले आहेस. जगण्याची संजीवनी प्रदान केली आहेस. सूराना आणि देवांना तारून त्यांना जिवनदानाचा वरच दिला आहेस!!धृ!!
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही । चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥ साही विवाद करितां पडिले प्रवाही । ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
अर्थ: त्रिभुवनात ( स्वर्ग, पृथ्वी आणि पाताल) हे देवी तुझ्यासारख कोणीच नाही. चार वेद ( ऋगवेद, यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद) सुध्दा आता थकुन गेले आहेत तुझी किर्ती गाऊन तरीही तुझे गुण संपतच नाही आहेत. आता शब्दही सारे संपले पण तुझा महिमा काही संपत नाही. जे सहा वेदाअंग आहेत शिक्षा, कल्प, व्याकरण, निरूक्त, छंद, ज्योतिष आणि जी सहा शास्त्र आहेत न्याय, वैशेषिक, संख्य, योग, मीमानसा, वेद त्यातही तुझे सत्यरूप उलगडले नाही आहे. तुझी किर्ती अगाध आहे.भक्त ती गाऊ शकत नसला तरीही तु तुझ्या भक्तांना लगेचच पावतेस.!!2!!
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां । क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥ अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा । नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥
अर्थ: हे देवी तुझे रूप खुपच प्रसन्न आहेस. तुझे हे प्रसन्न रूप पाहुन तूझे जे खरे भक्त आहेत तेही प्रसन्न होऊन जातात. जे क्लेश आहेत राग, लोभ, द्वेष, अहंकार, अविद्या, मत्सर त्यांनपासून मोक्ष दे. अंबे तुझ्याशिवाय माझी ही आशा पुर्ण करण्याचे सामर्थ कोणातच नाही. तुझ्या पायांवर तल्लीन झालेला हा नरहरी विल्लिन होत आहे.!!3!!
✍🏻किर्ती सोष्टे समेळ.
kirtisoste225@gmail.com
9833180933
Mumbai
Email.: kirtisoste225@gmail.com
विश्व मराठी परिषदेचे टेलीग्राम चॅनेल सबस्क्राईब करा
Comments