रुखरूख अंतरीची
सरली पुन्हाच केंव्हा
सांडून टाकिले तू
मौनांतरास जेंव्हा
फुलली प्रभातकिरणे
मन दिगंतरास जाई
वाचाळता मनाची
होतसे मूढ तेंव्हा
सांगू कशी तुला मी
क्षण एक एक रेखी
गतकाळ संचिताचे
आठवात येती जेंव्हा
माझ्याच संपुटाला
मन दुष्ट दृष्ट लावी
अन जोडल्या मनातून
दाटलीच तेढ केंव्हा
पाखडती धग कोणी
कधी बीज मत्सराचे
पेरती यत्ने कोणी
क्षणकाल वैर केंव्हा
सा-याच वल्गनांना
मिळुनी उणावू दोघे
नच काळ ना कळीची
क्षिती बाळगूच केंव्हा
© सौ. राधिका अविनाश दाते
122 ड शनिवार पेठ
नेने घाट - पुणे 4111030
मोबा. नं.- 9881871914
Kommentare