कोरोना...
वाटलं नव्हतं देवा, असाही दिवस येईल २३ मार्च या दिवशी सारा देश बंद होऊन जाईल कधी नव्हे ते देशामध्ये लॉकडाऊन हे झालं विमान-रेल्वे-रस्ते वाहतूक सारं काही ठप्प झालं जनजीवन हे आज सारे विस्कळीत झाली थैमान घालीत कोविड-१९ ची महामारी इथे आली रस्त्यावरती वर्दीतले देव फक्त दिसून राहिले रुग्णवाहिका, कोविड सेंटर जागोजागी दिसले या आजाराला सारेच जण घाबरून गेले होते रस्त्यावरती विना मास कुणीच फिरत नव्हते सारं काही जनजीवन सुरळीत चालले होते या कोरोनाने बरेच काही लोकांचे गेले होते दिवसागणिक देशामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले महागाईने जनसामान्यांचे कंबरडेच मोडीत काढले बेरोजगारी सगळीकडे अशी निर्माण झाली की, उपासमारीची वेळ आज ही लोकांवरती आली नैराश्येने कुणी आपुले जीवनच संपवून घेतले या कोरोनाने साऱ्या विश्वाला आपल्या विळख्यात घेतले सण नाही, उत्सव नाही, कुणीच केले यंदा ढोलताशा-बँड-लेझीम, नाही धांगडधिंगा देव बाप्पा ही येऊन गेले त्यांच्या गावाला नवसाला पावणारा राजा आज कोरोना पाहूनी गेला डॉक्टर-पोलिस-सफाई कर्मचारी यांच्यात देव दिसले दिवस-रात्र जागूनि सारे ते आपल्या जनसेवेत गुंतले काय करावे त्या चीनचे ज्याने हे सारं काही घडविले जैविक विषाणूचे जाळ त्याने साऱ्या जगात पसरविले एकीकडे चीन अन दुसरीकडे तो नापाक पाकिस्तान करतील नेहमीच कुरापती-खोड्या, अन कट कारस्थान स्वप्न त्यांचे राज्य करावे साऱ्या या विश्वावर विनवणी माझी देवाला, हे कधीच न होवो साकार

*✍🏻रोहिदास गोविंद चौधरी* *(दातिवरे-पालघर)* मोबाईल - ७२०८७२००५०

Email.: rohi.chaudhari89@gmail.com36 views0 comments

Recent Posts

See All
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेख