" चिमणी "सकाळची वेळ , खरं तर दिवस-रात्रीच्या चक्राप्रमाणे मानवी जीवनाचे चक्र ही सुरू . लगबग, धावपळ, घराघरातून येणारे आवाज, वाहनांचे आवाज एक ना अनेक . आज मात्र असं काहींच जाणवत नव्हतं. शांतता होती आणि ती मनामनातील अस्वस्थता सांगून जात होती. चिंतेचे मळभ वातावरण भर भरून राहिलेले.

अचानक बाल्कनीत समोरच चार-पाच चिमण्या . त्यांचा चिवचिवाट सुरू होता पण मनातल्या विचारांमुळे त्यांच्या आवाजा आधीचं , त्याच प्रथम दिसल्या. मन क्षणभर हरखून गेले. त्यांच्या आवाजाने प्रसन्नतेची तार नकळत छेडली गेली. आणि चिमणीच्या पावलांनी मन स्वैरपणे भूतकाळात अगदी बालपणीच्या आठवणीत रमून गेलं.

साखर झोपेतून जागं व्हायचं तेच या चिमण्यांच्या आवाजाने . झोपेतून उठायला मन करायचं नाही, पण आई, आजी लहानग्याला कडेवर घेऊन अंगणात यायच्या आणि अंगणातल्या चिमण्यांची ओळख व्हायची, पावलं वाजली की चिमण्या भुर्रकन उडायच्या तर दुस-याच क्षणी पुन्हा अंगणात गोळा व्हायच्या . चाणाक्षपणे अंगणात टाकलेले धान्याचे दाणे टिपायच्या.चिमण्यांचे आणि माणसांचे फार जवळचे नाते. माणसाची आणि चिमण्यांची ओळख अगदी पाळण्यापासून ची . बाळाची आई कामात व्यस्त असायची तेव्हा बाळराजे पाळण्यात झोपून हातापायांच्या कसरती करायचे, तेव्हा लाकडी पाळण्यावर टांगलेला चिमण्यांचा खेळण्याचं त्यांचा खरा मित्र असायचा

मांडीवरच्या लहानग्याला थोपटून झोपताना आई अंगाई गायची, त्यात ही चिमणीलाच बोलावणं व्हायचं. ' ये ग चिऊ , जा ग चिऊ, तुझ्या बाळाला माझ्या बाळाला टोपी शिवू ' म्हणजे चिमणी सुद्धा लेकुरवाळी आणि कुटुंब वत्सल असल्याची खात्री.

बाळाची अडखळणारी पहिली पाऊले अंगणात पडायची ती चिमण्यांना पकडण्यासाठीच. हातातला खाऊ त्यांना टाकण्यासाठी.बाळाला भरवणा-या आईच्या ओठी पुन्हा चिमणी . आई सारखं म्हणते , एक घास चिऊचा , एक घास काऊचा. त्या चिऊ-काऊच्या घासाने बाळाचे पोट भरते कधी न तो झोपतो कधी आईला ही कळणे अवघडच असायचे.

पुढं शाळकरी जीवनात तर चिमण्यांशी आणखी संपर्क वाढायचा . शाळेची पाटी ओली करून पुसण्यासाठी ( पाटी ओली करण्याचे अनेक पर्याय असायचे , हे नव्याने सांगायला नकोचं ) ओली पाटी हवेत हलवत हलवत म्हणायचे , ' चिमणी- चिमणी वारा दे, माझी पाटी सुकू दे .' मग पाटी खरचं सुकते, असा बालबुद्धी चा समज. मग पाटी खरंच सुकायची.शाळेतल्या बाईंकडून, गुरुजींकडून, वडीलधा-या मंडळींकडून गोष्टी सांगितल्या जायच्या. त्यात ही अग्रक्रमाने चिमणीचं असायची. सोबतीला कावळा ही यायचा. चिमणीच घरटं मेणाचे, कावळ्याचे शेणाचे. खूप मोठ्या पावसाने कावळ्याचे शेणाचे घर वाहून जायचे . पण चिमणीचे सुरक्षित असायचे . मग कावळेदादा पाहुणे बनून चिमणीच्या दाराशी हजर. आर्जवाने 'पुनः पुन्हा म्हणायचे. ' चिऊताई, चिऊताई दार उघड, चिऊताई चिऊताई दार उघड. पण चिऊताई पक्की हुशार. ' थांब माझ्या बाळाला अंघोळ घालते. थांब माझ्या बाळाला तीट लावते. अगदी बाळाला झोपते म्हणत - म्हणत तिचा पाढा काही संपचाच नाही. दाराबाहेर भिजून कुडकुडणारा कावळेदादा तोपर्यंत निघून ही जायचा. गोष्ट तशी साधीचं, सोपी. पण त्यातून ही चिमणीच्या संयमी पणाचा, स्वतःच्या संरक्षणासाठीच्या युक्तीचा समयसुचकतेचा आणि विवेकाचा संस्कार बालमनावर अगदी सहजपणे व्हायचाचं की.पावसाच्या हलक्या पहिल्या सरींनी माती ओली व्हायची. सगळी मुले अंगणात गोळा व्हायची वर- वरची भिजलेली माती हळूवार हाताने गोळा करायची. मग एका पायाच्या चौड्यावर अगदी घोट्यापर्यंत ही ओलसर माती ओढायची. एक सारखी थापायची थापता- थापता ' चिमणी, चिमणी वारा दे, असं पुनः पुन्हा म्हणायचं. मातीचा ओलसरपणा थोडा कमी झाला की अलगद पाय बाजूला काढून घ्यायचा झालं चिमणीचं घरटं. त्यातून एखाद्याचं मोडायचं ही. मग रडारड सुरु व्हायची, भांडण व्हायची पण पुन्हा हा खेळ सुरू व्हायचा.

इकडं लहानांचा असा खेळ भरात यायचा आणि चिमण्यांचा खेळ मात्र वेगळा सुरू व्हायचा. साठलेल्या पाण्याच्या छोट्याशा डबक्यात त्या उतरायच्या . गोल गोल गिरक्या घ्यायचा. मातीत अंग घुसळायच्या, पुन्हा डबक्यात गिरक्या, आणि इतकंच नाही तर भ