पहिली स्री..... .........................................
मी साधी-सुधी भोळीबाई,मला नको ग फार काही
मला लग्नाची झाली घाई,मला नवरा हवा ग बाई.।।धृ।
दुसरी स्री..................................................
अगं,पण तुला नवरा हवा कसाॽ
पहिली स्त्री.................................................
शंभर किलो वजन माझे,पंचवीस किलो त्याचे असावे
मी भांडेल,तो गप बसेल,असला नवरा हवा ग बाई
मी साधी-सुधी भोळी बाई मला नको ग फार काही
मला लग्नाची झाली घाई,मला नवरा हवा ग बाई.
दुसरी स्त्री.......................................................
खरच ग बाई तू खूप भोळी आहे............................
अगं पण तुला, नवरा गुणानी कसा हवाॽ
पहिली स्त्री...................................................
तो स्वंपाक करेल,भांडी घासेल, धुणं धूईल,घर झाडेल
सारं घरकाम नवरा करेल,असला नवरा हवा ग बाई
मी साधी-सुधी भोळी बाई ,मला नको ग फार काही
मला लग्नाची झाली घाई,मला नको ग फार काही
दुसरी स्त्री.................................................
खरच ग बाई..... तू साधी-सुधी भोळी आहे.
नवरा पाहायला ,तू तुझे गुण सांग की
पहिली स्त्री.................................................
मी सोडेल..................................................
दुसरीस्री.
लाज सोडेलॽ काय ग तू निर्लज्ज बाई.......
पहिली स्त्री......
मी घेईल...............................................
दुसरी स्त्री....................................................
दारु घेईलॽ बाई,बाई, बाई, बाई, बाई,........
पहिली स्त्री.....................................................
मी सोडेल म्हणजे,काम,क्रोध,मोह,लोभ,मत्सर सोडेल
मी घेईल म्हणजे,प्रेम,दया,क्षमा,शांतीचे विचार घेईल.
दुसरी स्त्री.....................................................
अगं,पण तुला नवरा नक्की हवा कसाॽ
पहिली स्त्री.................................................
स्री-पुरूष भेद न माननारा,स्रीभ्रुणहत्या न करणारा
हुंडा न घेणारा,दारू न पिणारा,सदगुणी असावा..
मी साधी-सुधी भोळी बाई मला नको ग फार काही
मला लग्नाची झाली घाई,मला नवरा हवा ग बाई
दुसरी स्त्री....................................................
वा,वा,वा....फारच ग छान बाई..........................
पहिली स्त्री..................................................
मी देवाशी समरस झाले,एक चित्ती त्याची झाले
सुखा-सुखी अनुभवले,एक ध्यानी त्याची फळे
दोघी........................................................
बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव, तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय...........................
कवी: अनिल देशपांडे (संगमनेर)
मो: 8983771257
ई-मेल: 1950deshpande@gmail.com
Comentarios