
देवाची भक्ती
करू मनोभावे
नको मनी कावे
नाहीच सक्ती ....
त्या देवळात
कां जावे हो खास ?
चराचरी वास
भाव मनात
ईश्वर वाली
गरिबांचा आहे
झरा तोच वाहे
संकट काळी ...
देवाशी गाठ
सेवा गरिबांची
भक्तीच्या मार्गाची
हीच ती वाट ...
जन्मा घालतो
देव माणसास
त्याच्या ठायी वास
देव करतो ....
सजीव प्राणी
देवाचाच श्वास
करू नये नाश
सत्य कहाणी ....
मार्ग तो हाच
देवास पोचतो
आशिष लाभतो
भक्ता तू वाच ....
सौ. मनिषा पटवर्धन
मोबा. नं. 9869033274
गोळप.. रत्नागिरी
mp_manisha@yahoo.co.in
ब्लॉगवर नवीन आहात ? नवीन ब्लॉगपोस्टच्या सुचना ईमेलवर येण्यासाठी सबस्क्राईब करा
Commentaires