top of page


असं एक गाव मला मिळवायचं आहे,

मिळवायलाच हवं,

वसवायलाच हवं.

अशी जी जागा मिळेल,

अशी जी वस्ती मिळेल,

असा जो ठाव मिळेल,

त्याचं नाव मी ठेवीन,

‘बेगमपुर’

जिथं कोणता ‘गम’ नसेल..

जिथं कोणता ‘अहं’ नसेल…

ना असेल दुखः,

ना शोषण असेल…

असेल ‘आनंद’ आणि फक्त ‘आनंदच’



कवी: डाॅ.नितीन पवार, (पुणे)

मो: 7776033958

ई मेल: np197512@gmail.com


कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.

 

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.

133 views1 comment

Recent Posts

See All

1 Comment


Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
Oct 24, 2020

वा वा मस्त

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page