बेभानबर्फाच्या तटी उभा ठाकलो

रक्षण करण्या मातेचे,

क्रूर शत्रूशी लढण्या आलो

वीर पुत्र आम्ही देशाचे ||


एक दिनी परि घाला पडला

संकट आले धावूनी

तोफ कडाडे, वीज कोसळे

वॄक्षही पडले उन्मळूनी

घाताला प्रतिघात चढविला

निशाण चढवू यशाचे

क्रूर शत्रूशी लढण्या आलो

वीर पुत्र आम्ही देशाचे ||


आग ओकती डोळे आणि

वज्र परजले वेगाने,

भान हरपूनी लढलो तेव्हा

रक्त सांडले शत्रूचे

शूरवीर मावळे आम्ही

झुंज दिली बेभानपणे,

विजयश्रीला खेचून आणली

वीर पुत्र आम्ही देशाचे ||

जयहिंद, जयहिंद, जयहिंद ||कवयित्री: सौ. सीमा आठवले

मो: 9423568842

ईमेल: seemaathavale15@gmail.com


विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.

67 views0 comments

Recent Posts

See All
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.

विश्व मराठी परिषद

संस्था:
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,
झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,
पुणे, महाराष्ट्र - ४११००४
मो: ७०३०४११५०६
सोशल:
  • Facebook Clean
  • YouTube - White Circle
WhatsApp.png
# marathi
# marathibhasha
# marathikavita
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 

© Vishwa Marathi Parishad