मुलगी आणि बाप यांचं नातं.कधीकधी वाटत देवाने हे नात कशासाठी बनवलं.माहेरी मुलीला पाठीवर हात ठेऊन आधार देण्यासाठी. घरातलं प्रत्येक नात फुलाच्या हारात ओवण्यासाठी. घरात आनंद पसरवण्यासाठी कि गळ्यात पडून हट्ट करण्यासाठी.
खर तर हे नात म्हणजे घरपण होय.हसत खेळत घर हवं असेल तर प्रत्येक घरात एक तरी
मुलगी हवीच. बापाला मनमोकळ कवाड खुल करण्यास देवाने दिलेली ही खूप सुंदर देण होय.शिस्त लावणार ,चुकांकडे दुर्लक्ष करणार,प्रत्येक वेळी हो हो तुझच बरोबर म्हणणार,आई विरूद्ध मुलीची बाजू मांडणार व तिला आई पेक्षा मोठेपणा देणार नातं म्हणजे बाप..
कधीकधी वाटतं हक्क काय असतो आणि तो कसा गाजवावा हे सहज सिद्ध करणार न्यायालय म्हणजे बाप.माझ्या साठी हे करून आण अस हक्कान सांगणारा नातं म्हणजे बाप कारण त्याला माहित असत इतर कुणासाठी नाही पण कितीही थकली तरी माझी लेक माझ ऐकेलच.
मुलगी कितीही सधन सुखसंपन्न असली तर कधीकधी तिच्या हातावर चार टिकल्या टिकवण्यात त्याला खूप आनंद वाटतो तो असतो बाप.काही गोष्टी मनातल्या न बोलता लपून छपून कराव्या अस वेडं असत ज्याच मन तो बाप .स्वतःच लेकीची नातं जगापलीकड कस जपता येईल याचाच विचार करत युक्त्या लुप्त्यांचा विचार त्याच्या मनात सतत चालत असतो तो तिच्या चेह-यावर आनंद बघण्यासाठी. तिन आणलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या आठवणीत असते.वेळ काळी स्वतःचे हट्ट तिच्याकडून हक्काने पुरवून घेणारही एकच नात असत ते म्हणजे बा..
दिवाळी आली कि मनातून त्याला सतत वाटत कि मी माझ्या हातून मुलीची साडीचोळी
सजावी. घरातलं इतर नाती कितीही गोष्टी पुर करत असल्या तरी स्वतःच्या हातानं मुलीनं भरवलेला घास
किंवा बापानं मुलीला दिलेली शंभरीच्या नोटीतला बंध इतका घट्ट असतो कि अख्ख विश्व त्यापुढे फिकं पडतं.
एका लेकीचा बाप होणं आणि बापाचं काळीज असणारी लेक होणं हे फक्त त्या बाप लेकीच्या नात्यलाच ठाऊक असत. प्रत्येकाचा अहवाल मागणार एक प्रशासकीय कार्यालय म्हणजे बाप.स्वतःच्या मनातल्या इच्छा सांगून 'माझी अशी इच्छा आहे 'अस करायच का? ऐवढी करशील ना?बाई हे तुझ्या हातच्या करून आणशील का? चुपचाप करशील हं? तुझ्या आईला पण नको सांगू आपल्या दोघात ही गोष्ट राहू दे ,तुझ बरोबर आहे.अस विश्वासाच व्यासपीठ लेक या नात्यात कस गाजतं ते फक्त एका लेकीच्या बापालाच माहित असतं...कारण माझ हे चुकलं यार मी अस करायला नको होत हे कबूल केल जात तेही फक्त आणि फक्त मुली समोरच... जिभेचे चोसले हक्कान पुरवून घेता येणार स्वयपाक घर. या एका अपेक्षेव्यतिरीक्त तो कुठलीच मागणी तिच्याकडे करत नाही. उलट तिच्या दिवाळीच्या उटणे घासून इवल्या हातांनी केलेली आंघोळ सासरी गेल्यावर तो कायम स्मरणात ठेऊन त्याच हातात शंभरीची नोट वर्षानुवर्षे कशी टिकवता येईल याची रोज वाट बघत असतो....
पूर्वी लोक म्हणत असत 'पहिली बेटी म्हणजे धनाची पेटी 'कारण लेक काहीच करत नसली
काहीच देत नसली तरी काळजाचा तुकडा असते तिच्या बापाची. जगातलं सगळं ऐश्वर्य ,सगळ सुख देणारी प्रत्येक गोष्ट त्याला त्याच्यापुढे फिकी वाटायला लागते.तिची चाहूल ,तिचा आवाज ,तिची भेट ,तिने भरवलेला घास त्याच्याकरता सर्वात मोठ धन असत...
खरतर सासरी गेल्यावर मुली संसार आणि सासरची कर्तव्य करण्यातच माहेर जपत असतात.तिच्यासाठी माहेर म्हणजे दुय्यम स्थान तिला वाटत नसेल तरी तिच्या कृतीतून ते सहज ठरवलं जात.कारण बाप आणि माय या दोनच नात्याला तिचा संसार म्हणजे प्रथम प्राधान्य देण हे कळत असतं.
मुलीच्या डोळ्यात अश्रू न येण्यास कायम तिला सार करतांना चेह-यावरचा आनंद दाखवत दारात तिच्या पुढच्या फेरीसाठी ऊंबरठ्यावर स्वागतासाठी सज्ज असतं ते फक्त आणि फक्त बापाच काळीज....
मंजू वणवे
अमरावती ९५११७८०८१५
Email.: manjuwanve32@gmail.com
विश्व मराठी परिषदेचे टेलीग्राम चॅनेल सबस्क्राईब करा
Opmerkingen