top of page

अवघड वाट


हया लाकडाउन च्या काळात दूरदर्शन वरील न्यूज हाच फार मोठा आधार वाटतो . अशीच एक बातमी पाहिली अंन मन धस्स झाले .ही कथा आहे समाजातील त्या घटकांची ज्या वर्षानुवर्ष आपला अवघड व्यवसाय सांभाळत आपली मुलेबाळे जगवत आहेत.

     एक नामांकित प्रसिद्ध शहर ह्या करोना च्या विळख्यात पूर्णपणे अडकलेले ,याच शहरातील एक  उपेक्षित वस्ती लॉक डाऊन च्या काळात जवळपास दोन ते अडीच महिने टिनाच्या पत्रया मागे बंदिस्त ,बंदिस्त असूनही एकही करोना बाधित या वस्तीत सापडल्याची बातमी नाही.

शरीराचा शरीराशी थेट संबंध येणारी ही वस्ती इथे कुठले सोशल डिस्टंसिंग आणि कुठले मास्क .रेड लाईट एरिया म्हणून प्रसिद्ध असलेली ही शापित बस्ती टीना मागे दगडी मोडकी जुनाट इमारत टीना मागून उदास भकास दिसणारे बायका मुलांचे चेहरे मन गलबलून टाकणारे विदारक दृश्य. शरीर संबंधावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो त्या बापड्यांना कसा पाळता येणार सोशल डिस्टंसिंग. गलिच्छ वाट उडवत आत जेमतेम एक माणूस जाऊ शकेल अशी निमुळती बोळकांड ,जागोजागी व्हिडिओ सिगरेट ची थोटके आत मध्ये अंधारच अंधार ,न घराला खिडक्या न हवा यायला व्हेंटिलेशन फक्त एक मळकट बिछाना ह्या अशा नरक वस्तीत लोक कुठले सुख मिळवायला येतात कोण जाणे ?अवघ्या वीस ते तीस मिनिटात आपला कार्यभाग संपवून पैशाची उधळपट्टी करणारे आपल्या सोबत काय काय आजार आणत असतील कोण जाणे ? याच वस्तीत शबनम बोलत होती दोन-तीन महिने एकही गिराईक नाही रोजची उपासमार .आम्ही शरीर विकतो पण आम्हाला जान प्यारी आहे ना ? आम्ही कसेही उदरनिर्वाह करू पण गिराईक नाही करणार काय यांचे भविष्य कसे भवितव्य ?पुनर्वसन करायचे ठरविले तरी समाज त्यांना आपल्यासह वाटचाल करू देईल का? कोण करणार त्यांचा उद्धार अशिक्षित लाचार आणि वर्षानुवर्ष हाच व्यवसाय करणाऱ्या या समाजातील लाचार महिला यांनी जर आपला धंदा बंद केला तर समाजातील हे भूभूक्षित वखवखलेले रानटी पशु आपली भूक कशी भागवतील ?यांच्या विकृत कृत्यांमुळे समाज आणखीनच विटा ळला जाईल हे सर्व मनाला सुन्न करणारे ! वास्तविकते कडे नेणारे तिथून निघता निघता रेशमाचे शब्द कानावर पडले आम्हाला पैसे नाही मिळाले तरी चालतील पण हा व्यवहार बंद करणार नाही निदान समाजातील बलात्काराची संख्या, अल्पवयातील मुलींवर होणारे अत्याचार काही अंशी तरी कमी होतील तेवढाच आमचा सहभाग!

      ही समस्या कधीच संपणारी नाही का?  याला जरी अल्पविराम घातला तरी रेषा काही वेळ थांबेल पण पूर्णपणे कधीच संपणार नाही जोपर्यंत पूर्णविराम दिला जाणार नाही

हा सामाजिक ज्वलंत प्रश्न यक्षप्रश्न म्हणून आमच्या समाजापुढे  उभा ठाकला आहे . आहे का यावर तोडगा ? की हे असेच चालत राहणार कोण याला वाचा फोडणार कोण ही अवघड वाट सहज सोपी करून समाजात नवीन क्रांती घडविण्याचा प्रयत्न करू शकेल ?याचीच आज गरज आहे .तो दिवस कधी येईल कोण जाणे.


लेखिका: उर्मिला राजदेरकर (नागपूर)

मो: 9420189495

ईमेल: uarajderkar@gmail.com


लेख आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.

 

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.

120 views1 comment

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज,...

1 comentario


Deepak Bhalerao
Deepak Bhalerao
30 oct 2020

वेगळा विषय हाताळल्या बद्दल लेखिकेचे अभिनंदन !

Me gusta
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page