top of page

अंकुर....



घरात माणसे व चौका चौकात आदर्शांची पुतळे धूळ खात पडलेले असताना

विषाणू पेक्षाही जलदगतीने माणसे एकमेकांवर जळण्यात व एकमेकांना संपवण्याचा आराखडा तयार करण्यात मग्न असताना

माणसांनी देवांना बंदिस्त केलं का देवांनी माणसांना बंदिस्त केलं? हे आवाक्याबाहेरचं असताना

देव ऑनलाइन उपलब्ध आहेत पण भक्ती अजून ऑनलाईन उपलब्ध नाही

भक्ती म्हणजे मनातून मना कडचा प्रवास

रोबोटच्या मम्मीला पान्हा कसा फुटणार?

जीवनाचाही अभ्यासक्रम असतो

तो बदलला की नव्याने सामोरे जावं लागतं. नव्याअभ्यासक्रमाला जुनी प्रश्नपत्रिका चालत नाही.

अनेक प्रश्न अनुत्तरित असतांना जोड्या लावा व संदर्भासहित स्पष्टीकरण द्या? हे प्रश्न कसे सोडवणार?

माणसे आता चेहऱ्यावरून ओळखलेच जात नाहीत अशा युगात

आज काल मधूनच अचानक उध्वस्त व्हायला होतं

संपलं वाटत असतानाच नवीन अंकुर येतो

जीवन जगण्याची नवी आशा दाखवून जातो

आज अचानक कुणीतरी यावं, भेटावं.

जीवनाचा चेहरामोहरा बदलून टाकावा असं वाटत असतानाच

अचानक लक्ष जातं अडीअडचणीत, कपारीत

उगवणारे इवलेसे कोंब जगायला जे प्रवृत्त करतात.



अनिल कुलकर्णी.

Email.:anilkulkarni666@gmail.com



ब्लॉगवर नवीन आहात ? नवीन ब्लॉगपोस्टच्या सुचना ईमेलवर येण्यासाठी सबस्क्राईब करा (Add Link) http://vishwamarathiparishad.org/subscribe

226 views0 comments

Recent Posts

See All

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page