अंगणअंगणात माझ्या ।

डेरेदार वृक्ष ।।

सावलीस दक्ष ।

घरासाठी ....।।


अंगणात माझ्या ।

मेंदीचे कुंपण ।।

सडा सारवण ।

दैनंदिन ....।।


अंगणात माझ्या ।

रेखीव रांगोळी ।।

झुलते बंगळी ।

विसावण्या ....।।


अंगणात माझ्या ।

प्राजक्ताचा सडा ।।

दरवळे वाडा ।

सुगंधित ....।।


अंगणात माझ्या ।

शोभे वृंदावन ।।

नक्षीचे कोंदण ।

आच्छादन ....।। 


अंगणात माझ्या ।

फुलांचे आगार ।।

फिरती भ्रमर ।

भवताली....।।


अंगणात माझ्या ।

पाखरांची शाळा ।।

गाणी गाती गळा ।

वाऱ्यासंगे ....।।


👍 कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.


डॉ . विनय वसंतराव दांदळे (अकोला)

मो: 9764188106

ईमेल: drvinaydandale@gmail.com


 

नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.

286 views0 comments

Recent Posts

See All