- Vishwa Marathi Parishad
अजिंठा लेणी

वंदे संस्कृती जगत मांगल्ये, तेज्योमय पथदर्शी शिळा अहिल्ये. लेण्या रुपी राजकुमारी देखणी, ध्यानस्थ युगे युगांतात ही योगिनी. चित्र, शिल्प अलंकार शोभती, कलेचा भावार्थ सौम्य मुखावरती. सुरेख नक्षीवेल केशलटा विखुरते, वनराईचे वस्र वलय गुंफिते. निर्मळ नदीचे बांधियले पैंजण, हाती निसर्ग विविधतेचे कंगण. कर वंदियले तथागताच्या चरणी, तपोभुमीवर जन्मली अशी योगिनी. अशा संस्कृतीस शतदा वंदावे, अमर कलेसह जीवन जगावे. जन्म सार्थक करावे या जगती, किर्तीवंत रुपेण उरावी महती.
नाव: सचिन राजेंद्र वाघ
रा नगरदेवळा ता.पाचोरा, जिल्हा. जळगाव,महाराष्ट्र.
पिन नं -424104. मोबाईल क्रमांक 9307680616.
Email.: wagh4781@gmail.com
ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
274 views1 comment