top of page

आयुष्याला आणखी काय मागणे...?




आयुष्यात आणखी काय मागणे असायला हवे... आपण सदैव हे ना ते मागतच राहत असतो. आयुष्याकडे मिळालेल्या संधी सारखे बघितले तर प्रत्येक संधीचं सोनं करण्याच काम हे आपलं असतं. मनात असलेला मीपणा जर सोडला आणि सगळं आपले म्हणून चाललं तर सगळं जग आपलं असतं; पण काही लोकांना मीपणा म्हणून जगण्याची सवय असते आणि त्यामुळे नाती, माणसे सगळे जण दुरावतात आणि अशी माणसे एकाएकी एकटीच पडतात. नदी सगळं काही आपल्या पोटात घेऊन निरामय झुळझुळ संथ तिच्या मार्गाने धावत वाहत राहते. सूर्य दररोज त्याच्यात वेळेवर उगवतो आणि त्याच्याच वेळेवर मावळतो.निसर्गातील प्रत्येक घटक त्याचे काम अगदी वेळोवेळी कुठलाही कंटाळा न करता पार पाडते.आपणही हा बोध, हेच तत्व, आपल्या मानवी आयुष्यामध्ये स्वीकारून आपल्या आयुष्याला योग्य ते वळण देऊन शकतो. उगाच कुणाचा हेवा तरी कश्याला...?


केवळ आपल्याकडे नसलेल्या गोष्टीची तक्रार करत बसण्यापेक्षा आहेत या गोष्टींमधून आपण काय चांगले करू शकतो याची धडपड कधीही केलेली चांगली! दोन हात, दोन पाय, सगळं काही व्यवस्थित असताना पण आपण काही नसल्याची उणीव व्यक्त करीत असाल तर ती सगळ्यात मोठी चुक आहे. कारण जगामध्ये असे लोक आहे त्यांच्याकडे या गोष्टी नसतानाही त्यांच्या आयुष्यामध्ये ते यशस्वी होतात. हातपाय नसणारे एव्हरेस्ट सर करतात.मग आपण हातपाय असणाऱ्याने नुसतं हातावर हात ठेवून बसण्यात काय अर्थ! "We can do everything",हे वाक्य सदैव मनात ठेवून आयुष्याला जिंकलं पाहिजे. तेव्हा आयुष्य रुपी या अनमोल मोत्याला हळूच ओंजळीत जपून सगळ्यांना आनंदाने सोबत घेऊन जगण्याचा प्रयत्न करुया! आपल्या जगण्यातून,वागण्यातून आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट घडत असते याचा विसर कधीही होता कामा नये!आयुष्यामध्ये देणाऱ्याची भूमिका पार पाडावी त्यामुळे आपल्या आयुष्याला खरा अर्थ उरतो.शेवटी आयुष्यातील कोणत्याही प्रश्नांमध्ये गुंतल्यापेक्षा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न नक्की करावा.


जेव्हा विचार कराल तेव्हा प्रश्न पडतील, आणि जेव्हा प्रश्न पडतील तेव्हा उत्तरासाठी आपण स्वतःहून धडपड कराल, आणि जेव्हा स्वतःहून धडपड करीत असतो तेव्हा उत्तरेही लवकर भेटतात आणि त्याचे समाधान ही मात्र फार वेगळे असते. जेव्हा प्रश्नांची उत्तरे मिळतात तेव्हा आयुष्यातला खरा आनंद मिळतो.आपण नेहमी आयुष्याची तक्रार करत काही ना काही मागत राहतो आयुष्याला ,तेव्हा आपण आयुष्याचे रसिक कमी आणि भिकारी जास्त होऊ जातो. तेव्हा रसिकाची भूमिका घेऊन आयुष्य चांगल्या रीतीने जगूया,कारण येणारी प्रत्येक समस्या, प्रश्न ही माणसासाठी असतात माणूस सगळ्यासाठी नसतो. पण माणुस हेच सगळं विसरून समस्येला आयुष्य समजून जातो हे सुद्धा तितकेच खरं! या विळख्यातून बाहेर पडून पहा,तुम्हाला कळेल या जगाला पण तुमची गरज आहे.स्व:ताला कमी न लेखत आहे त्यात समाधान मानुन जगणे कधीही बरे!



अॅड.विशाखा समाधान बोरकर

रा.पातुर जि. अकोला

7798147784

Email.: vishakhasb06@gmail.com


ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

426 views0 comments

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज,...

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page