आजचा शाम म्हणजे आजचे मूल घडवणे हे प्रत्येक पालकसाठी मोठे आवाहन आहे कारण आजचा शाम हा पालक सांगतिल तस ऐकनारा नाही आणि भोळा तर मुळीच नाही म्हणून सांगितलेली प्रत्येक गोष्ट मनासारखिच होईल अशी पलकांची समज निव्वळ गोड गैरसमज असेल.
आपण आतापर्यंत नेहमी ऐकत आलोय की लहान मुल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडत जाते;पण आता मात्र ह्या मतीच्या गोळयाला घडवन्यासाठी मूर्तिकाराला अजूनही कसब पणाला लावावे लागणार आहे म्हणजे त्यातून घड़नारी जी मूर्ती असेल ती नक्कीच आजच्या स्पर्धेच्या युगात तीच स्थान टिकवून ठेवेल याचाच अर्थ असा की मूर्तिकार म्हणजे पालक आणि पालकाला आजचे मूल मूर्ती स्वरुपात घडवतांना प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाइनें हातळायची आहे प्रत्येक मूर्तिकार अगदी जीव आतून मूर्ती घडवन्यायसाठी प्रयत्न करत असतो आणि त्यावेळी तो मुर्तीची काळजी देखील तितकिच घेत असतो
मुर्तीकराची भूमिका बजावन प्रत्येक पालकाला जमेलच अस नाही ज्या पालकाला हे जमेल त्याची नहत सफल होऊन त्याने घडवलेली मूर्ती म्हणजेच मूल हे नक्कीच त्याने केलेल्या प्रयत्नाची मिळालेली दाद म्हणता येईल.
ज्या प्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे एका बाजूला जर पालक असेल तर दूसरी बाजूही बलकाची असते;पण पालक कधी बलकाची बाजू पडताळून बघतात का? पालक आपल्या आशा अपेक्षांचे ओझे मुलावर लादून स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालक नको त्या अपेक्षा बळगुण बसतो आणि मूल व् पालक यांच्यात मोठया प्रमाणात दरी निर्माण होण्यास अशी कारणे सहाय्यभूत ठरत असतात त्यासाठी पालकाने आपल्या मुलांची बाजू समजून घेताली तर पाल्याला योग्य दिशा देण्यासाठी मदत होऊ शकते त्यासाठी त्याला आपल्या मुलाच्या आवडी नीव डी,कौशल्य,छंद यांसारख्या घटकांना लक्षात घेतले व् त्या दृष्टिने प्रयत्न केले नक्कीच ते प्रयत्न प्रत्येक बालकासाठी एक वरदानापेक्षा कमी ठरणार नाही; नुसतेच त्यांचे चांगले गुण ओळखून त्यानाच् वाव देण्याच् काम पालकाने न करता त्यांचे दोष लक्षात घेऊन त्यांना त्यासाठी जर धीर देऊन योग्य मार्गदर्शन करुन दोष कमी करण्याचा प्रयत्न हा पलकचा पुरेपूर असेल तर त्यासाठी त्या बालकाचा सर्वांगीण विकस घडेल असे म्हणन्यास हरकत नाही आणि सर्वागीण विकास साधलेला बालक हा कुठल्याही क्षेत्रात गेला तरी त्याला फारशा अडचणी येत नासतात.आजच्या आधुनिक व् तंत्रज्ञानाच्या युगामध्ये फ़क्त यंत्र मानवासारखे चालणे म्हणजे प्रगती म्हणता येणार नाही भावनिक क्षमता व् बौद्धिक क्षमता (eq, iq) यांची सांगड घालण्याचे कौशल्य त्याने आधीपासूनच आत्मसात केलेल असेल नक्कीच त्यातून प्रभावी अशी मूर्ती म्हणजेच व्यक्तिमत्व निर्माण मदत होत असते आणि त्यमागे नक्कीच एका अथक प्रयत्न करणाऱ्या मूर्तीकाराची भूमिका महत्वपूर्ण होती हे एक सत्य नाकारता येणार नाही.......
सौ.शुभांगी माळी
नाशिक मो नं 7058083749
shubangi85@gmail.com
ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Comments