आई म्हणजे जीवन सुरवात
मावशी म्हणजे जीवन प्रवास!
आई म्हणजे जीवनाचा पाया
मावशी म्हणजे जीवनाची छाया!
आई म्हणजे डोक्यावर सावली
मावशी म्हणजे ह्रदयात माऊली!
आई म्हणजे ईश्वरीय रूप
मावशी म्हणजे साक्षात स्वरूप!
आई म्हणजे मागणी, पुरवठा
मावशी म्हणजे हट्ट, तहान भागवणारा पाणवठा!
आई म्हणजे सदा बरोबर साथ
मावशी म्हणजे मनात सदैव साथ!
आई विना जग भिकारी
मावशी विना जग लागे ना भारी!
राजेश पुंडलिक थेटे (कवीराज)
7 प्लुमेरिया ड्राईव्ह, पुनवळे, पिंपरी चिंचवड, पुणे 33
9373322368 Email.: rpthete@gmail.com
ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Comments