(दर्शना प्रभूतेंडोलकर)
देशाचे भावी शिलेदार तुम्ही ,
डोळ्यांत हजारो स्वप्ने पाही .
मनगटात जोर भारी ,
मनं घेते उंच भरारी.
नवनवीन तंत्रज्ञान आज तुमच्या दारी,
पण जाऊ नका कधी आहारी.
होतील स्वप्ने साकार तुमची ,
जिद्द सोडू नका कधी तुमची.
आधारस्तंभ उद्याचे तुम्ही,
कोलमडून जाऊ नका कधी.
घालताना आकाशाला गवसणी
नाळ तोडू नका ह्या धरतीशी.
अपयश ही यशाची पहिली पायरी,
ठेवा स्वीकारण्याची तयारी.
आयुष्य हे अडथळ्यांच्या शर्यतीचे,
ऊन- पावसाच्या तडाख्याचे.
शिवरायांचे वंशज तुम्ही,
आठवावा प्रताप त्यांचा तुम्ही.
अंधाराचे ढग ओसरीता होते सोन्याची सकाळ,
मौन सोडून व्यक्त व्हा ,
मार्ग सापडेल निःसंदेह.
होतील स्वप्ने साकार तुमची,
पाठलाग कराया सोडू नका कधी.
करा शून्यातून विश्वाची निर्मिती,
आकार द्या स्वप्नांना ,
पंख पसरूनी आभाळात घ्या गरूडभरारी,
बळ हवे तयांसी निर्धाराचे , विश्वासाचे.
येतील अनेक चढउतार वाटेवरती,
काट्याकुट्यांचे मार्ग खडतर ,
भिऊ नकोस तरीही,
काट्यांशिवाय गुलाब दिसले आहे का कधी ?
दर्शना प्रभूतेंडोलकर (मुंबई)
मो: 9930796496
ईमेल: darshanaprabhutendolkar@gmail.com
Comentários