बीज इवलाले बाई मातीत पडले तहान भागता माय कुशीत निजले इवल्या जीवाला फुटे अंकुर इवले इवले डोळे जग देखी आसुसले ।। अंकुर वाढला कोंब कोवळे कोवळे कूस मायेची सोडून जगी पाऊल टाकले ऊन पाऊस पिऊन बाई रोप तरारले हात मायेचा पाठी आभाळी झेपावले ।। झाड आनंदले अन मोहरली फुले फुलाच्या कुशीत नवे बीज जन्मलेले फळाचे कवच त्याने बीज जोपासले बीज मायेच्या ओढीने बाई मातीत पडले ।। मीनल विटकर-झांबरे (पुणे)
मो: ७०६६९५८३३५
ईमेल: meenal.zambare@gmail.com
कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.
Comentários