वयवय झालं, वय झाल असं काही नसत

पुनः एकदा बालपणाच्या उमेदीन जगायचं असत.


वय वाढलं की अनुभव देत असत

दिशा बदलत विश्वासान जगायचं असत.


वय झाल , वय झाल अस काही नसत

नवी आशा नवी उमेद देत असत.


वय झाल तरी जबाबदाऱ्या पेलवायच्या असतात

ठेच लागली तरी उठून आशा फुलवायच्या असतात.


जगता जगता खूप रडायच हसायचं असत

चाचपडत चाचपडत स्वत: ला सावरायचं असत.


नाती जपत जपत स्वतः ला जपायचं असत

जीवनाच्या घडामोडीला सामोर जायच असत.


वय झाले तरी जीवन कलेन जगायचे असते

मृत्यूची वाट पाहायची नसते,

विधात्यावर विश्वास ठेवून आनंदाने जगायच असत


वय झाल तरी जीवन गाण गातच राहायच असत

जीवन गाण गातच राहायच असत…..नाव : सौ माधुरी नागेश भोईरकर

मोबाइल/व्हॉट्सअप क्रमांक : ८८५०६२४६९१

स्त्री

शहर : कल्याण

Email.: madhuri.bhoirkar@gmail.com


ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.

306 views0 comments