![](https://static.wixstatic.com/media/395a32_bd82456a5849425bbef2daa016c0c41d~mv2.jpg/v1/fill/w_754,h_397,al_c,q_80,enc_auto/395a32_bd82456a5849425bbef2daa016c0c41d~mv2.jpg)
घरी जन्माला येता लेक
आनंदाने उजाळते घरदार
लक्ष्मीच्या पावलाने होते
बापाच्या जीवनाची भरभराट
वंशाच्या दिव्या पेक्षा
दिवातली वात बरी
संस्कार आणि संस्कृतीचा
प्रकाश देते घरीदारी
गरिबीची तमा न बाळगता
परिस्थितीशी करते दोन हात
बापाच्या हाताला देते
कष्टाच्या मदतीचा हातभार
कुणाची मुलगी कुणाची ताई
कुणाची आई कुणाची बाई
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
निभावते भुमिका सर्वकाही
लेक वाचवा लेक शिकवा
नका करु वैचारीक मतभेद
अभिमान बाळगा लेकीचा
नका करु जन्माचा खेद
शिक्षण,उद्योग,नौकरीत
बरोबरीने चालते प्रवाहात
आवाज घुमतो सगळीकडे
अभिमानाचा या महाराष्ट्रात
राजेंद्र प्रल्हाद शेळके
मु.पो.किनगाव राजा
ता.सिंदखेड राजा
जि बुलढाणा
9823425852
Email: rajendrashelke2018@gmail.com
ही कविता कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर शेअर करा.
Beautiful poem!