top of page

आईपणाची संस्कृतीशिवकालातील हिरकणी नसानसातून वाहते आईपणाची संस्कृती ती आजही जागवते तान्ह्या बाळाला घरी ठेवून दुधविक्रीसाठी तिला बाहेर पडावं लागलं संसारासाठी पै जोडताना बाळाच्या ओढीने जीवाचं रान करत परतावं लागलं तो शिवकाल होता तिचं आईपण जोखायला स्वतः शिवबा तिथे हजर होता त्यांनं तिचा गौरव केला आईपणाच्या संस्कृतीचा त्याने यथोचित सत्कार केला आजही पिल्लांना घरी ठेवून हिरकणीला बाहेर पडावं लागतं संसारासाठी पिल्लांसाठी पै जोडताना जीवाचं रान करत परतावं लागतं पण आता तो शिवकाल नाही तिचं कौतुक करायला शिवबा ही इथे हजर नाही लोकलचे धक्के खात कधी गाडीचं घोडं दामटत आता तिची चालते कसरत घर आणि ऑफिस दोन्ही आघाड्या लढवायची पिलांचे चेहरे नजरेआड करत ती झोकून देते ऑफिसात टू गीव माय बेस्ट म्हणत आणि काम संपताच स्विच ऑन करते स्वतःला पुन्हा आईपणाच्या मोडवर ही जीवघेणी कसरत खुपदा संपवावी वाटते तिला घराच्या घरपणात मुलांचं बालपण फुलवावं वाटतं तिला मुक्तपणे आपलं आईपण छान अनुभवावं नेहमीच वाटतं तिला आणि आपल्या वाटण्याची किंमत आपल्या ऐपती बाहेर आहे हेही पक्कं जाणवतं तिला मग ती स्वतःला बजावते अबला नाही सबला आहे मी... मातीत मूळ रोवत आभाळात पसरणाऱ्या बीजातील सृजनाची शक्ती आहे मी... जमिनीशी नातं कायम ठेवणारी तरीही आभाळाशी जोडू शकणारी कधी चपला बनून कडाडणारी तर कधी पावसाची शितल धार बनून शांतावणारी पिलांसाठीचा प्रेमपान्हा काळजात सांभाळत कड्यावरून उतरण्याचं धारिष्ट मनात जपणारी... कारण... शिवकालातील हिरकणी माझ्या नसानसातून वाहते आईपणाची संस्कृती ती आजही जागवते. कवयित्री: प्रीती पासलकर

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा

173 views1 comment

Recent Posts

See All

1 Comment


अप्रतिम

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page