विश्व मराठी परिषद

Jul 9, 20201 min

पर्यावरण

(कवयित्री: सौ. वर्षा भावे) 

गगना मध्ये उड़तात निरनिराळे पक्ष्याचे थवे,

प्राण्यांचा मेळा दिसे जिथे रान हिरवे-हिरवे!!

काळ्या भोर ढगातून पाण्याची धार निघाली,

झाड़े, फुले, पाने, डोंगर आनंदात नाहली,

धरणी हर्षित झाली ,त्या पावसाच्या पाण्यानी,

सुगंध दरवळतो मातीचा ,धरती सजली झाडांची!

असावं सारं नैसर्गिक, असावी रानांची माळ,

आपसात आनंदाने, झाड़े वाजवी टाळ,

खळखळ नद्यांच्या लाटा, धरणी हिरवी मखमली,

त्यावर आनंदी मन माझे, काया माझी नाचली!

ऊंच इमारत, कारखाने यांनी प्रकृतीचा केला -हास,

होई जीवाला त्रास, राहीला नाही शुद्ध तो श्वास,

झाड़े नाही सावली साठी, पाण्या साठी नद्या नाही,

नाही घेत पाखरे ऊंच भरारी, पिल्लांना रहायला घरटी नाही !

किलबिल सारी थांबली, थांबले सारे झरें,

प्रदुषित झाले वातावरण ,दूषित होऊनी संपले सारे,

नाही दिसणार फूलं-पाखरे,पृथ्वी आणि तारे,

पुन्हा रचू निसर्ग चला उचलू मिळुनी विड़ा सारे!

"धरती माता माय आपुली रक्षण तिचे करू चला,

झाड़े हिरवी लावू चला हिरवळ पुन्हा वाढवू चला"

सौ. वर्षा भावे

मोबाईल- 9301976696

मो: bhavevarsha11@gmail.com

    2040
    9