विश्व मराठी परिषद

Nov 5, 20201 min

महाराष्ट्रास..

महाराष्ट्राचा मी एक पाईक शाहीर माझे नाव;

हाती लेखणी धरुनी करी समशेरीचे घाव!

शिवशंभूच्या कर्तृत्वाने पावन झाली इथली माती;

त्या मातीचा लावू टिळा आज शंभूच्या नावे माथी!

सह्याद्रीचा काळा पत्थर उभा राहिला पाठीशी'  

देतो स्फूर्ती शूरवीरांना रक्षा या महाराष्ट्राशी!

एकचि बाणा असे आमुचा सांगे राम आम्हास;

शिकवण ठेवोनि ध्यानी त्यांची करितो सायास!

सिंह ज्यांचा तो गर्जला सबंध भारत वर्षात;

केली होती ज्यांनी मदांध इंग्रजांवरती मात!

असा माझा महाराष्ट्र ! आहे काय कमी ह्यात?

पुण्यत्वाची वसली नगरे माझ्या मायभूमीत !


 
कवी: पुंडलिक गवंडी (अहमदनगर) 
 
मो: - ९२७२१३५९११

ईमेल: pcgawandi@gmail.com


नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.

    3800
    15