भारताच्या सुपुत्रांनी;
मायबोलीचा सन्मान केला,
मराठीचा झेंडा;
अटकेपार गेला!
ज्ञानेश्वर माउलींनी;
गायली हिची थोरवी,
अमृताची उपमा देऊन;
मराठीत रचिली ज्ञानेश्वरी!
आता मात्र दिवस फिरले;
उणे पण हिला आले,
मराठीत शिकणे, बोलणे;
कमी पणाचे वाटू लागले!
भाषा जोवर असेल प्रवाही;
तोवर ती टिकते,
नसेल तर हळूं हळूं;
विस्मृतीत जाते!
मातृभाषेच्या संवर्धनाचा;
आपण घेतलाय वसा,
द्याल पुढच्या पिढीला जर;
हा समृद्ध वारसा!
तर मराठी जगेल टिकेल;
विश्वभाषा होईल,
नाहीतर आपल्या सवे ती ही;
इतिहासजमा होईल!
कवयित्री: सौ. सुनंदा रामचंद्र धर्माधिकारी, अहमदनगर
मो. +91 9850026937
नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.
Comentários