व्यथा पुतळ्यांचीशहरात उभारले पुतळे.झाले उदघाटन नारळही फुटले

दिवसांमागून दिवस गेले.पुतळ्यावर चढे धूळ

पक्षी  टाके  विष्ठा

साफ करी एखादा सज्जन ... एखादा दृष्टा

दयनिय  अवस्था  म्हणती...दिवस  किती  फिरले

शहरा  मधले  पुतळे


शिवाजी  महाराज  की जय. महात्मा  गांधी की जय

ज्योतिबा फुले  की जय. बाबासाहेब अंबेडकर की जय

पंधरा  अगस्ट ...सव्वीस जानेवारी

पुण्यतिथी  आणी  जयंती 

थोरामोठ्याची करून साजरी ...काय साधले हो आजवरी

गहीवरले  परी  विचार करुनी थकले

शहरा मधले  पुतळे


सरकार शांत जनता शांत ..

राजकारण  नाही शांततेचा  प्रांत

मग एकाने लढविली शक्कल

पुतळ्यास  फासून काळे पाजळली  अक्कल

रातोरात खबर  पसरली . सभा निषेध  निदर्शने

दंगली  उसळली...कुण्या जातीचा कुण्या नेत्याचा

राजकारणात रंग भरले...ऐकून  थक्क झाले सगळे

शहरा मधले पुतळे


अश्रू धूर लाठीमार पाहून रक्तांचे सडे

पुतळ्यांच्याही  डोळ्यांचे भरले  कडे..

झाले पुतळे एकत्र सुरू झाले चर्चा सत्र..

नको आम्हाला हार-नारळ  नको  मानपान

पण नका करु आमच्या विचारांचा अपमान...

.निर्धार  होताच  अघटीत घडले

अन्, रात्रीतून गायब झाले ...शहरा मधले पुतळेकवयित्री: सौ. वृषाली पाटील (लातूर)

मो. 9763839771

ईमेल: vrushalivikram77@gmail.com


कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.

58 views1 comment

Recent Posts

See All
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.

विश्व मराठी परिषद

संस्था:
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,
झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,
पुणे, महाराष्ट्र - ४११००४
मो: ७०३०४११५०६
सोशल:
  • Facebook Clean
  • YouTube - White Circle
WhatsApp.png
# marathi
# marathibhasha
# marathikavita
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 

© Vishwa Marathi Parishad