
छान मी वाढते आई
तुझ्या उदरात ॥
इवलाश्या अंगणी
फिरे मी दिनरात ॥
उपटून टाकतात का
लावलेलं रोपं कुणी
लावण्या आधी विचार
का आला नाही मनी ?
चिमुकले रोपं मी
मज फेकणार गटारात ॥
आताच वचन देते मी
तुम्हांस आई बाबा
कधी दुःख नाही देणार
वाढविल घराची शोभा
अनभवू द्या मज सुख
ओल्या सुक्या पदरात ॥
नटणं मुरडणं शिकेल
आई , मी तुझ्या कडून
वेणी फणीचं सुख
देईल तुज मी रडून
घुटमळेल पायी तुझ्या
पिल्ला वाणी स्वयंपाक घरात ॥
मदत तूज करता करता
अभ्यास करीन डोंगराएवढा
भांडी , धूणी , पुस्तकातली गाणी
हळूवार फुलेल मनी केवडा
संस्कारित नाजूक मन
तन निरामय येईल भरात ॥
पाठवणीपर्यंत तुम्हांस
देईल मी निखळ हासू
पाठवताना माझ्यासाठी
टपकतील का चार आसू ?
चार दिस जीव लावण्या
उभी राहील तुमच्या दारात ॥
जीणं जन्मभर माझे
पाहुणी म्हणून आहे
कन्या, बहीण , पत्नी
आईविना राहणार का घरात ?॥
इवलाश्या अंगणी
फिरे मी दिनरात ॥
👍 कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
गोपीनाथ भागवत काळे, अहमदनगर मो: 8975432687
ईमेल: gopinathbkale@gmail.com
नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.
Comments