top of page

आपल्या आणि आपल्यांच्या सुखासाठी



आज पुन्हा भावनाचा फोन आला. म्हणाली, "Do you know, you are a blessing to my life?" मला लक्षात आलं, ती आमच्या कालच्या Reiki session बद्दल बोलत होती. Blessing मी नाही, तर रेकी आणि तिच्याद्वारे काम करणारी सकारात्मक शक्ती होती.


काल ऑफिसला जाताना cab मधूनच फोन केलेला तिने. अगदीच रडवेली झाली होती. म्हणाली, "जमलं असतं तर आत्ता तुझ्या घरी आले असते. पण आता संध्याकाळी येईन. अजून कुणाला वेळ दिली नसशील, तर मला रेकी हवीये." म्हटलं देऊया की, त्यात काय.. पण तुला काय झालंय, बरं वाटत नाहीये का?"


म्हणाली, "तब्येत तशी ठीक आहे, पण ही आपली म्हणावीत अशी माणसंच एकेकदा असं डोकं उठवतात ना, कितीही केलं तरी कमीच पडतं त्यांना.. आणि ते ही अशावेळी सगळं उकरून काढतील, जेंव्हा आपण अगदी helpless असू." भावना माझी एक जवळची मैत्रीण आहे, त्यामुळे तिच्या परिस्थितीचा साधारण अंदाज होता. ती पुढे बोलू लागली, "please help me Pradnya, मला खूप low वाटतंय. भीती वाटतेय, की एवढ्या रागात, काही तरी चुकीचे निर्णय घेईन मी."


म्हटलं, "थांब जरा, कोणतेही निर्णय घ्यायची घाई करू नको. आपण संध्याकाळी बोलूच, पण तू आत्ता शांत हो. ५ मिनीटं cab मध्येच शांत झोपून राहायचा प्रयत्न कर. Reiki will be with you right a way." आम्ही फोन बंद केला.


१० मिनिटांनी कॉल करावा, की तिला झोप लागली असेल… अशा विचारात होते, तेवढ्यात तिचाच मेसेज आला, की "I reached office. Feeling much better. No Headache now. Call you later.."


ऑफिस आणि कामाच्या flowमध्ये मेसेज केला असणार, हे लक्षात आलं; आणि तिचं 'feeling better, no headache' मात्र दिवसभरासाठी मला feel good करून गेलं.


आपल्या जवळच्या लोकांचं सुखी/ समाधानी असणं आपल्यासाठी कित्ती महत्त्वाचं असतं ना! आपल्या सुख-दुःखाच्या व्याख्या त्यांच्याशीच तर जोडलेल्या असतात! ह्या सगळ्यांनी सुखी-समाधानी राहावं, असं आपल्याला कितीही वाटलं तरीही, प्रत्यक्ष करण्यासारखं आपल्या हातात काही नसतं. मग हे सगळं स्वतःवर ओढून न घेता, समाधानाने जगण्याची एक trick सापडलीये मला...काही वर्षांपूर्वी... ती share करण्यासाठीच खरंतर आजचा ब्लॉग लिहीतेय.


Sociology, Psychology आणि काही spiritual techniques मध्ये आपल्या primary किंवा close circleचा नेहेमी उल्लेख केला जातो. ह्या circle मधली माणसं ती असतात, जी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. त्यांचं नुसतं आपल्या आसपास किंवा सोबत असणं (physically किंवा mentally), त्यांची आपल्या-बद्दल, आपल्या कामा-बद्दलची मतं, त्यांचे आचार, वर्तन, ह्या आणि अशा प्रत्येक गोष्टीचा आपल्यावर फरक पडतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आनंद, हा ह्यांनी आपल्या फक्त सोबत असण्यावर, किंवा ह्यांच्या आनंदी असण्या-नसण्यावर अवलंबून असतो. ही व्यक्ती mostly आपला पार्टनर, आई, वडील, मुलं, सासू, सासरे, बहीण, भाऊ, मित्र, मैत्रीण यांपैकी कुणीही, आणि कितीही जण असू शकतात.


★ पाहिलं म्हणजे, ही माणसं नक्की कोण आहेत/असतील हे आपल्याला निश्चित ठरवता आलं पाहिजे. (माझ्यासारख्या) अती-emotional लोकांना अनावश्यक ज्याला-त्याला जास्त लावून घ्यायची घाणेरडी सवय असते. त्याचा त्रास फक्त आपल्यालाच होतो, त्यामुळे ह्या circleमधे entry मुळात selective लोकांनाच द्यायची.


★ एकदा ही माणसं ठरली, की दुसरं हे लक्षात घ्यायचं, की ही माणसं माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत, कारण, हे महत्व मी त्यांना दिलेलं आहे. त्यांचं माझ्या आयुष्यातलं स्थान, हे मी त्यांच्यावर, किंवा त्यांनी माझ्यावर लादलेलं नाहीये.


★ आणि शेवटचं म्हणजे, त्यांचं माझ्या आयुष्यात असणं हे माझ्यासाठी आत्यंतिक महत्त्वाचं आहे. ह्याचा अर्थ त्यांनाही ते तसंच वाटावं, हा आग्रह संपूर्णपणे सोडायला शिकायचं.


ह्या आपल्या circleसोबत निसर्गतः आपण असे गुंतलेलो असतो, की मुळात हे सगळं मान्य करणंच खूप कठीण जातं. पण माझ्या मते तीच खूप महत्वाची step आहे. मनाला बिचाऱ्याला एकदा वळवलं, की बाकीचं सगळं ते आपोआप साध्य करून देतं.


शेवटच्या दोन्ही मुद्द्यांना supporting मुद्दा म्हणजे, हे सगळे आहेत तसे त्यांना मनःपूर्वक accept करायचं. ह्यात 'त्यांनी मला हवं तसं वागावं, ही अपेक्षा न करणं' अपेक्षित आहे. उदाहरणा दाखल सांगते, काहींची आपला पार्टनर well-dressed नसतो ही complain असते. आपण basically ती त्या माणसाची priority नाही, हे समजून कायमसाठी मान्य करुन टाकलं, की प्रत्येकवेळी त्या व्यक्तीसोबत वावरतानाचा वैताग कमी होऊ शकतो. बऱ्याच वयस्कर आई-वडिलांची complain असते, की आता मुलं आमच्या मनाप्रमाणे/मूल्यांप्रमाणे वागत नाहीत. अशांनी आपल्या मुलांची बदलती विचारसरणी मान्य करून टाकावी. त्यांनी जगात एक स्वतंत्र, सुदृढ नि विचारी व्यक्तिमत्त्व असणं, हे जास्त महत्वाचं आहे. आणि आपल्याला त्याचं समाधान जास्त पाहिजे, हे लक्षात घ्यायचं.


ह्या आपल्या जवळच्या व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागतील तर आपल्याला प्रचंड आनंद, समाधान लाभतंच. पण वागायचं कसं, हा तर सर्वस्वी त्यांचा निर्णय, त्यांची इच्छा आहे. आपल्या सारखंच त्यांनीही कळत नकळत ठरवलेलं, त्यांचंही एक close circle आहे. आणि आपण त्यात असावं की नसावं, ही आपली इच्छा असूच शकत नाही!


Painful it is, even to understand..! पण हे मान्य करून वागणं, हाच एक समाधानी राहण्याचा मला तरी सापडलेला मंत्र आहे. पुर्णतः कुठे वळलाय अजून! पण प्रयत्न मी सोडणार नाहीये.. आपल्यासाठी आणि आपल्यांच्या सुखासाठी.


तुमच्याही काहीतरी strategies असतीलच ना, मला समजून घ्यायला नक्की आवडतील. Commentsमध्ये नक्की कळवा.




…………..


सद्गुरू वामनराव पैंची विश्वप्रार्थना आठवतेय.. माझ्यासोबत म्हणाल..?

हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे

सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.

सर्वांचं भलं कर, कल्याण कर रक्षण कर,

आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदे।



नाव - प्रज्ञा वझे - घारपुरे

mepradnya22@gmail.com

439 views3 comments

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज, वंशज, जनता, जनक, जननी, तनुज, तनुजा, अग्रज, अग्रजा, वगैरे शब्द घड

पारंपारिक अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान :: पूर्ण ब्रम्ह

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशीश्यते || अर्थ :: (अेका धार्मिक पुस्तकात आढळला) ब्रम्ह पूर्ण आहे, भासमान निर्मितीही पूर्णच आहे, ब्रम्हापासून विश्वनिर्मित

टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page