शिक्षण - एक सामाजिक समस्या

शिक्षणाची शीडी वाढत चालली उंच
ना पाल्यांचा हात पुरत ना पालकांचा
बाजार मांडलाय हा नुसता शिक्षण सम्राटांचा
पॅकेजेस मात्र आकर्षक खेळ चालतसे पैशांचा
अधुनिकतेच्या नावाखाली चाले नोकर कपात
आरक्षणाच्या नावानी बोकाळतेय ती जातपात
वाढतोय सगळीकडे नोकऱ्यांचा खरा तुटवडा
शिक्षणासाठी मात्र विद्यार्थ्यांनाच बसे कुरतडा
नोकरी मिळविण्यासाठी चालू मारामारी
बाजारात नोकऱ्यांची वानवा करा रोजंदारी
नव जवान तरुणांची असे वाढती बेरोजगारी
देशाचे तरुण रक्त उचकवण्यात कोणाची जबाबदारी?
मग शिक्षणातील मागास वर्ग उतरतो रस्त्यावर
कधी कधी उच्च शिक्षीतही त्यांच्याच मार्गावर
त्या साऱ्यांना पाठींबा असतो विरोधी पक्षांचा
देश कसा अशांत होईल हाच विचार हो त्यांचा
कवी: भालचंद्र मातेरे (पुणे)
मो: 9823678125
ईमेल: bhalchandrama@gmail.com
कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.