top of page

शिक्षक जगला पाहिजे 



पिढ्यामागून पिढ्या घडवणारा 

शिक्षक टिकला पाहिजे 

आधुनिक काळाच्या खडतर आव्हानांपुढे 

तो झुकला नाही पाहिजे 


ज्ञान दानाचा वसा घेतलेला 

शिक्षक जगला पाहिजे 

तंत्रज्ञानाच्या वावटळीत तो 

उत्तम तगला पाहिजे  


साधेपणाने वागत राहणारा 

शिक्षक सन्मानाने राहिला पाहिजे 

मुला बाळांना घडवणारा तो 

शिक्षक मनामनात बसला पाहिजे 


समाज घडवणाऱ्या  शिक्षकांप्रती 

कृतज्ञ असले पाहिजे 

शिक्षकाचे स्थान उच्च राखण्याइतके 

सुज्ञ असले पाहिजे 


तरुण  मनांना घडवणार्‍यांचे 

महत्त्व  मानले पाहिजे 

साधेपणातल्या गुरुतत्वाचे 

सत्व जाणले पाहिजे 


समाजाला दिशादर्शक शिक्षक 

दिपस्तंभ समजला पाहिजे 

नवीन पिढ्या घडवणारा तो 

अमृतकुंभ उमजला पाहिजे 


आयुष्यभर शिल्पे घडवणार्‍याला 

ध्यानात घेतले  पाहिजे 

मातीतून मडकी घडवणार्‍याला 

ज्ञानात राखले  पाहिजे 


आयुष्यभर झिजणार्‍या शिक्षकास

चंदनासम  जाणून घ्यावे 

पवित्र त्या गुरु जनास 

वंदन करत जावे 


गुरुजनांच्या कार्याची आठवण 

मनोमन आठवावी 

गुरु माऊलीच्या उपकाराची जाण 

हृदयामध्ये साठवावी 


स्पर्धेच्या या युगात शिक्षक 

नीट जगला पाहिजे 

सेवाभावात जगणार्‍याशी समाज 

नीट वागला पाहिजे 


शिक्षण बाह्य कामापासून तो 

दूर असला पाहिजे 

शिक्षणासाठीच शिक्षक हा 

सूर असला पाहिजे 

तंत्रज्ञानाचे धडे त्या कडून 

गिरवून घेतले पाहिजेत 

तंत्रज्ञानाचे प्रयोग त्याकडून 

करवून घेतले पाहिजेत


तंत्रज्ञानाच्या वादळातही शिक्षक 

नीट टिकून राहील 

परंपरा आणि आधुनिकतेच्या मिलापात 

शिक्षण उजळून जाईल


कवी: राजेंद्र झुंजारराव

ईमेल:rsz.modern@gmail.com


कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.

 

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.

551 views0 comments

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज,...

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page