मुलगा आणिक मुलगी
हा भेद नसावा जीवनी
एक नाणे दोन बाजू
महत्व घ्या समजाऊनी
सूर्य अन् चंद्र हे दोन डोळे पृथ्वीचे
दिवस अन् रात्र आहेत दोन्ही ही महत्वाचे
समतोल असतो धरतीचा तो राहण्यास नभांतरी
एकही नसता सृष्टि जीवंत राहील का तरी ?
हवा आणि पाणी यात करतो आपण भेद का ?
कमतरता एकाची तरी भागवू शकतोच का ?
संस्कार आणि ऊच्च शिक्षण द्यावे दोघांसही
न कोणी कमी, न कोणी जास्त, वाटतील शिकल्यावरी
कवयित्री: सौ. शिवानी श्री. वकील (पुणे)
मो: 9765390096
ईमेल: shivanivakil9@gmail.com
Comments