मी राहत होती सुशिक्षित राज्यात,
आत्ताच ज्याने केली कोरोणावर मात,
मलप्पुरम जिल्ह्याच्या मुन्नासुर भागात,
आनंदी होते मी भाऊबंदा बरोबर कळपात.
आयुष्य आमचे पन्नास ते सत्तरचे,
कुणालाही त्रास न देण्याचे,
जंगलात निवांत फिरण्याचे,
असतात दिवस आमचे सुखाचे.
आमची स्वतःची वेगळी असते भाषा,
कधी हळूच आवाजात असतो बोलत,
ते तुम्हालाही कधी नाही कळत,
अन् दूरवरचे भाऊबंद येतात पळत,
मी होते फक्त पंधरा वर्षांची,
अशा सहवासानंतर माझ्या पोटातही होते बाळ,
माझेही सुंदर जगण चालू होते,
मलाही कडक डोहाळे लागले होते.
फिरत फिरत चुकून तुमच्या क्षेत्रात आले,
तिथे होते आकर्षित अननस पडलेले,
त्याच्या वासाने मन माझे मोहरले,
तुमच्यावर विश्वासाने तोंडात टाकले.
आणि मग कळलं, मानवानेच केला घात,
तोंडातच स्पोट होऊन जबडा माझा फाटला,
मला कळलं, माझा मृत्यू अटळ होता,
माझा खूप मोठा विश्वासघात झाला होता.
आम्ही सर्व भारतात सत्तावीस हजारापर्यंत आहोत,
त्यातले अडीच हजार तुमच्या ताब्यात आहेत,
असेच तुम्ही आम्हाला संपवत आलात,
तर पुढील पिढी आम्हाला फोटोतच पाहिल.
आता एकच विनंती करते जाण्यापूर्वी,
माझे मारेकरी सापडतील, शिक्षाही होईल,
पण कायद्याच्या भीतीने आम्हाला संरक्षण न देता,
एक मित्र म्हणून माझ्या पाठीशी उभे रहा.
बाबांनो,तुम्हीही सुखाने जगा,
आणि आम्हालाही जगू द्या,
आता सांगा यात माझं काय चुकलं?
आता सांगा यात माझं काय चुकलं?
कवयित्री: सौ. माधुरी विजय देवरे (नाशिक)
मो: ९९७०८१८९२४
ईमेल: deoremadhuri0@gmail.com
कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.
हा विषय आत्तापर्यंत कोणी हाताळला नव्हता .तो तुम्ही छान मांडला .