मास्क सदा नाकावरती कोण ते कळेना
आपले कि परके असती हेहि आकळेना !!
अधिक चेहरा तो लपला चित्र की जुळेना
ओळखीतल्या चेहऱ्यांशी मेळही बसेना
"काढ की तू आत्ता " म्हणुनी हेहि सांगवेना !
बोलले कि काही जरीही स्पष्ट ते कळेना
शब्द आणि आवाजाची खूण ही कळेना
काय म्हणाले ते त्यांना पुन्हा सांगवेना !
काढण्याची सवलत येथे कुणासही नाही
भीती असे ज्याला त्याला योग्य ते हि नाही
" मी काढतो, तूही काढ " हे हि सांगवेना !
कुठे नेऊनि ठेवियले ... जग कुठे कशाला ?!
कोण विचारी ना कोणा , न माहितहि कोणा
कोण साधले की काय हेच आकळेना !
अनिल अंकुलकर
Email.: anilankulkar@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा
छान आहे