क्षणाक्षणाला क्षण दु:खांचे
जीवन म्हणजे रण दु:खांचे...
सुकून गेल्या जखमा हिरव्या
तरी राहती व्रण दु:खांचे...
पसा पसा आनंद लाभला
अता वेचतो कण दु:खांचे...
दुरावलेले जवळी येण्या
कारण ठरते पण दु:खांचे...
आनंदाचे उत्सव करतो
करु साजरे सण दु:खांचे...
असेल जर का जगायचे तर
विसर "दिवाकर" क्षण दु:खांचे...
दिवाकर चौकेकर (गुजरात)
मो: 9723717047
ईमेल: choukekar.divakar@gmail.com
Comments