देवा तुझ्या नामाचा भरला बाजार
देवाचा करे व्यवहार आता आला करोणा आजार
पैशासाठी लोकांनी देवही विकला
माणूसपण संपलं आता जगण्याला मुकला
हयाचे पाय ओढ पुढे चाललाय तो
निवडणुकीत पाड म्हणे वरचढ झालाय तो
कीर्तनात माईक ओढत महाराज गायना
त्यांना दंभ द्वेष नाही सुटला दिसताय आयना
आया बहिणी वर डोळा फिरवी
झाली नियत खराब संन्यासाला फाशी जिरवी
कुठे बघा कीर्तनात बुवा आले
गोड बोलून बाई घेऊन पळाले
विश्वास कुणावर आणि व्यवहार झाला फाशी
मेंढरा वाणी भरती गाडीत म्हणे दाखवतो काशी
धंदा फार जोराचा झाला आता
मृत्यूशय्येवर माणूस आला अश्रू येती माता
कोणी नाही कुणा पुरवण्या सरणावर जाणार
जाता कोणी त्याला निश्चित करोना होणार
आता तरी डोळे उघडा नीट वागा
देवा विठ्ठलाचे सत्कर्म नाम घेऊनी जगवा आणि जगा
कवी: राजेश लक्ष्मण वऱ्हाडे (अकोला)
मो: ९९२११२५२३९
कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.
Comentários