top of page

आम्ही शेतकऱ्यांची औलाद


कष्ट करून थकल्या जिवाची ऐका हो कोणी ही कहाणी आम्ही शेतकऱ्याची औलाद नाही करणार कुणाची पायधरणी झाली नांगरणी आणि केली पेरणी आणखी किती करावी धडपड झाली झोळी फाटकी आता अन खिशालाही पडलं भगदड टाचा झिजल्या केसही गेले वाहून काळ्या आईच्या सेवेत आम्हालाही पाहिजे धान्य रुपी अमृत किती राहावं गरिबांच्या रांगेत पावसाचं म्हणाल तर आता कशाला काढू दुखावरच्या खपल्या कोण देतं आमच्या मालाला भाव नुसत्याच आश्वासन देणाऱ्या बाहुल्या आम्हाला म्हणती जग सगळे जगाचा पोशिंदा अन बळीराजा आम्ही खातो शिळी भाकर तरी नाही राहणार उपाशी प्रजा चालणं आता भाग आहे थकल्या जरी येथे वाटा आलं नाही पीक जरी मेहनतीनेच काढायचा काटा झालं जरी कर्ज डोक्यावर तरी जीव मात्र देणार नाही नको सरकारची भीक आम्हाला पाठीचा कणा वाकणार नाही दिवसरात्र वावरात राबून काढू आम्ही कष्टाचे मोती मातीशी नाळ आहे आमची अन पशु पक्षी हीच नाती कोपला जरी निसर्ग तरी सुटली नाही आमची आशा या मनगटात आहे भरलेली उज्वल भविष्य पेरायची नशा रडायचं नाही शेतकरी मित्रांनो आता आपल्याला फक्त लढायचं नशीब असो की अपयश त्याला आता फक्त गाडायचं शरीर पोळणाऱ्या उन्हाची आता सवयच झाली आहे झालो जरी जर्जर तरी पुन्हा उठण्याची उर्मी आहे आले जरी वाटेत तुफान तरी आता माघार नाही वादळांना घाबरून फिरणं पावलांनाही पसंत नाही सांगतो आता छाती ठणकावून नशिबा दाखव तू पण तुझा माज आम्ही कास्तकरी आहोत तयार सदा घुमणार फक्त आमचाच आवाज नशिबा तुझे भरले दिवस आता माझ्याशी आहे गाठ तुला ठेचून काबाडकष्टाने इथेच रोवणार झेंडा छातीत ताठ ढासळला जरी बुरुज आमचा तरी निधड्या छातीची ढाल आहे आज जरी दिवस आम्हाला लुटणाऱ्यांचा तरी येणारा शेतकऱ्याचाच काळ आहे


कवी: निलेश बाळासाहेब पाऱ्हाटे (शिरूर, पुणे) मो: 9665966186

ईमेल: nilesh.parhate1@gmail.com

210 views0 comments

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज, वंशज, जनता, जनक, जननी, तनुज, तनुजा, अग्रज, अग्रजा, वगैरे शब्द घड

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page