आपला सैनिक
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
- Jul 17, 2020
- 1 min read

नेहमीच का जाते सैनीकांचे बलिदान ? आयुष्यपणाला लावून का सतत जावे त्यांचे प्राण?
सैनिक आपला नेहमी देशासाठी जीव गमवतो... ना त्याला भेटते आईची माया... ना सोबत असते कुटूंबाची छाया...
ना खेळवतो तो आपल्या चिमुकलीला... ना वेळ देतो तो आपल्या मित्रांना....
ना करतो सण साजरे ना पाहतो कोणाचे रूप हसरे....
देशासाठी हे जीवन आहे निष्ठने देशासाठीच रमवतो...
सैनिक आहे तो आपला आयुष्य आणि नात त्यालाही आहे.... जेव्हा मरतो कोणाच्या घरी सैनिक फक्त एकदा जाऊन त्यांचे हाल पहावे...
करा काय तरी करा नको जाऊदे सैनिकांची आपल्या आहुती.... देश जगतोय सुखाने अन देशाची होतेय सैनिकामुळे विकासाची प्रगती...
राहुल सुनील देवरुखकर
ईमेल: suvarnashabda91@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.
Commentaires