सोडून खूप दुःख
सुखाचा देवाकडे धावा केला
साधूबुवा सांगेल तो
वृत्त माझा मी पाळला
विश्वास माझा त्यावर
म्हणून मी देव पुजला
मागणं माझं मागून
त्याकडे मी नवस केला
होणार इच्छा पूर्ण
पावणार देव माझ्या नवसाला
श्रद्धा त्यावर माझी
कैव जो त्यानं दिलेला
कर्मकांड सर्व करून
शांचित्तेन मी मनी झोपलेला
पेटता निरंजन साक्षीला
चालू वात दिवा रात्रीला
चिरकाल टिकावे सुख
सोबती ठेवून त्या आशेला
टाकून दैवरूप पारा
अंधश्रद्धेचा आरसा मी केला
बुवा बोले जसे
तसे मी मार्ग निवडला
वाट दावी दिशेला
मी देव दगडात शोधला
👍 कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
कवी:- तुकाराम परसराम डोके पाटील (उस्मानाबाद)
मो: 9765574163
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.
Comments