top of page

विश्व मराठी परिषद आणि भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज आयोजित

​अमेरिकेतील मराठी बांधवांसाठी

पौरोहित्य परिचय

ऑनलाईन अभ्यासक्रम

BHISHMA Logo.jpg
भीष्म इंडिक फाउंडेशन 
विश्व मराठी परिषद.jpg
विश्व मराठी परिषद

चार महिन्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम

१९ ऑगस्ट ते १० डिसेंबर २०२३

दर शनिवारी-रविवारी | प्रत्येकी दीड तास | Zoom द्वारे

 

 आचार्य : सोमयाजी सुहोता आपटे, अग्निहोत्री 

आपटे कुटुंबाला २०० हून अधिक वर्षांची पौरोहित्य आणि याज्ञिकीची परंपरा

 

एक उत्तम करियर संधी | आंतरराष्ट्रीय ऍक्रिडिएशन प्राप्त अभ्यासक्रम 

महिला-पुरुष सर्वांना प्रवेश | वयोमर्यादा - १२ च्या पुढे

​​उजळणीसाठी सर्व अभ्यासवर्गांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार आहे

भारतीय समाज पिढ्यानपिढ्या धार्मिक प्रवृत्तीचा आहे. भारतीय जीवन परंपरेचा पाया म्हणजे सनातन वैदिक संस्कार आणि संस्कृती आहे. देवतापूजन, उपासना आणि पूजा पद्धती हा एकूणच भारतीय माणसाचा स्थायीभाव आहे. दैनंदिन पूजा तसेच नैमित्तिक पूजा हा भारतीय कुटुंब व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. पूर्वीच्या काळी आणि काही कुटुंबांमध्ये आजही दैनंदिन पूजन हा दिनचर्येचा एक अविभाज्य भाग होता. भारतीय मानस मुळातच श्रद्धाळू आणि आस्तिक मनोवृत्तीचा आहे. पृथ्वीवर आपले वास्तव्य असताना सर्व प्रकारच्या अधिभौतिक आणि अधिदैविक शक्तींची आपल्यावर कृपा असावी, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत आणि आपले जीवन सुखमय, आनंदमय आणि चैतन्यमय व्हावे अशी धारणा आहे. देवतांची पूजा आणि उपासना मनाला, बुद्धीला आणि चित्ताला अपार आनंद देणारा अनुभव आहे. त्यातून होणारे एका प्रकारचे ध्यान आणि पूजेमध्ये रममाण होणे हा अत्युच्य आनंद आहे. वैयक्तिक पूजा आणि सामूहिक पूजा पारंपारिक पद्धतीमध्ये विकसित होत गेल्या. त्यातूनच पूजा आणि उपासना तंत्रातील तज्ज्ञ अशा पुरोहित किंवा भटजी यांच्या सहकार्याने वैयक्तिक यजमान म्हणून आपल्या घरांमध्ये तसेच सामूहिक पूजा करण्याची परंपरा निर्माण झाली. वेदपाठशाळेतून खडतर प्रशिक्षण घेतलेले पुरोहित यांनी ही परंपरा पुढे विकसित केली जी आजही निरंतर सुरु आहे.

आज भारतीयांनी विविध क्षेत्रांमध्ये खूप मोठी प्रगती केली आहे. सातासमुद्रापलीकडे म्हणजे अमेरिका, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आदि खंडांमध्ये त्यांनी वास्तव्य केलेले आहे. काळाच्या या प्रवाहामध्ये गतिमान जीवनपद्धतीमुळे दैनंदिन पूजा आणि उपासना यांची आपली थोडी फारकत झाली आहे. विशेषतः अमेरिकेसारख्या देशामध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्य करून असलेल्या मराठी बांधवांना याची निकड जाणवत आहे. सत्यनारायण पूजा, वास्तूशांत, विवाह, गृहयज्ञ, नक्षत्रशांती इ. साठी मराठी पुरोहित मिळणे थोडे अवघड झाले आहे.

प्रा. क्षितिज पाटुकले यांच्या संकल्पनेतून विश्व मराठी परिषद आणि भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज यांनी ऑनलाईन पौरोहित्य अभ्यासक्रम सुरु करण्याचे ठरवले आहे. प्रख्यात विदुषी, व्यासंगी प्रवचनकार आदरणीय कल्याणीताई नामजोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यासक्रम तयार केला आहे. प. पू. स्वामी गोविंददेवगिरि महाराज, कोषाध्यक्ष, श्रीरामजन्मभूमी न्यास, अयोध्या यांचे आशीर्वाद या उपक्रमासाठी लाभले आहेत. अमेरिकेतील सुप्रसिद्ध कीर्तनकार सौ. रश्मीताई बर्वे आणि त्यांचे यजमान श्री. नितीन बर्वे यासाठी समन्वयाचे काम पाहणार आहेत.

या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती (Brochure) व्हॉट्सअ‍ॅपवर मागवण्यासाठी +16503151128या क्रमांकावर Paurohitya असा मेसेज पाठवा.

अभ्यासक्रमातील समाविष्ट घटक : परिचय स्तर

१) पूजा व उपासना - व्याख्या आणि उद्दिष्टये

२) नवविधा भक्ती

३) पौरोहित्य संकल्पना

४) षोडपोचार पूजा पद्धती आणि पूजा साहित्य आणि पूजेची तयारी

५) पूजा विधान - संकल्प, आवाहन, प्रतिष्ठापना, समाप्ती 

६) विविध उपास्य देवतांची ओळख, त्यांचे वैशिष्ट्य

७) संस्कृत अक्षर आणि भाषा ओळख

८) संस्कृत प्राथमिक उच्चार ओळख आणि संथा

९) गणपती अथर्वशीर्ष भाग - १ व भाग - २ 

१०) श्री गणेश प्रतिष्ठापना, गौरी प्रतिष्ठापना, विसर्जन, घटस्थापना, कुमारीपूजन इ. 

११) विविध व्रते आणि वैकल्ये, आरत्या, चार्तुमास, सण आणि उत्सवांची ओळख

१२) घरची रोजची पूजा तसेच नैमितिक पूजा

१३) पाठांतर + उजळणी

१४) ऑनलाईन परीक्षा

WhatsApp Image 2022-07-29 at 3.23_edited.jpg

प्रथम स्तर पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणती कौशल्ये प्राप्त होतील ?

१) संस्कृत भाषा, उच्चार यांचे प्राथमिक ज्ञान होईल

२) पूजा आणि उपासना पद्धती, नवविधा भक्ती यांची माहिती होईल

३) पूजेची तयारी कशी करावी, संकल्प कसा करावा आणि पूजा साहित्य कोणते लागते याचे कौशल्य प्राप्त होईल

४) विविध देवतांची ओळख व माहिती होईल आणि ती सांगता येईल

५) विविध स्तोत्रे आणि श्लोक यांचे पाठांतर होईल आणि अर्थ माहित होईल

६) षोडोपचार पूजा पद्धतीची माहिती होईल, प्रत्यक्ष षोडोपचार पूजा करता येईल

७) रोज घरची पूजा करता येईल

८) गणेशोत्सवामध्ये गणपती, गौरी प्रतिष्ठापना करता येईल

९) घटस्थापना करता येईल, कुमारीपूजन करता येईल

१०) विविध व्रते, सण, उपासना, नामस्मरण यांची माहिती होईल

११) संस्कृत भाषेची संथा मिळेल. पुढे संस्कृत शिकता येईल

१२) यजमानांच्या घरी पूजा करता येतील इ.

चौकशी / माहितीसाठी संपर्क :

रश्मी बर्वे - 1-650-3151128 (Call / WhatsApp)

Email: bhishmaindicusa@gmail.com

10685 Grapnel Place Cupertino CA 95014 USA

भारतातील कार्यालय :

मो: 7030411506 / व्हॉट्सअ‍ॅप: 9503864401

(सोम ते शनि - सकाळी १०:३० ते सायं. ८ वा.)

ईमेल: sampark@vmparishad.org

विश्व मराठी परिषद कार्यालय : ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, हनुमान चौक, डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४

bottom of page