top of page

जो बोलेल त्याचा मालही विकला जाईल आणि ज्याला बोलता येत नाही त्याचे सोनेही पडून राहील...!

यशस्वी वक्ता बना... उत्तम संवादकौशल्ये प्राप्त करा...
प्रभावी सूत्रसंचालक बना... कार्यक्रमांचे आयोजन करा.... 


विश्व मराठी परिषद आयोजित 

वक्तृत्व, संवादकौशल्ये, ​सूत्रसंचालन आणि कार्यक्रम आयोजन
ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम  

विश्व मराठी परिषद.jpg
विश्व मराठी परिषद

चार महिन्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम

०२ ऑक्टोबर २०२२ ते २६ जानेवारी २०२३

सोमवार ते शुक्रवार | रोज संध्याकाळी ०७.०० ते ०८.०० | Zoom द्वारे

मार्गदर्शक: डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी

पूर्वाध्यक्ष - अखिल भारतीय साहित्य महामंडळ, प्रख्यात वक्ते, व्याख्याते,

ज्येष्ठ कवी, लेखक, संवाद - माध्यम तज्ज्ञ, समीक्षक, संपादक

 

प्रभावी वक्ता, सूत्रसंचालक व कार्यक्रम आयोजक म्हणून मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध...

महिला-पुरुष सर्वांना प्रवेश | वयोमर्यादा - १५ च्या पुढे

​​उजळणीसाठी सर्व अभ्यासवर्गांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार आहे

या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती (Brochure) व्हॉट्सअ‍ॅपवर मागवण्यासाठी 7066251262 या क्रमांकावर Vakta Abhyaskram असा मेसेज पाठवा.

Ancient Background.jpg

तुम्ही प्रभावी वक्ता बनू शकता का ? तुम्ही सभा गाजवू शकता का ?

तुम्ही नेतृत्व करू शकता का ? तुम्ही सूत्रसंचालन करू शकता का ?

तुम्ही यशस्वीरित्या कार्यक्रमांचे आयोजन करू शकता का ?

 

उत्तर : हो.... नक्की.... नक्कीच करू शकता...!

 

आजच्या जगात बोलता येणे, प्रभावी वक्तृत्व आणि अचूक संवादकौशल्ये ही जणू प्रत्येकाची गरज बनली आहे. बोलणाऱ्याची माती खपते आणि न बोलणाऱ्याचे सोनेही पडून राहते हे आपल्याला माहिती आहे. खरंतर बोलणची, संवाद साधण्याची उपजत इच्छा आणि उर्मी प्रत्येकाजवळ असते. मात्र कोणता तरी अनामिक अडथळा असतो. धाडस होत नाही. कुठून सुरुवात कराची, कशी सुरुवात कराची तेच कळत नाही. अनावश्यक दडपण येतं आणि मग राहूनच जातं...! खरंतर याचं कारण आहे मार्गदर्शनाचा अभाव. एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होतो, व्याख्याने ऐकतो तेव्हा आपल्याला मनोमन वाटत असते की अरे! मलाही हे नक्की जमेल. मलासुद्धा वक्ता बनता येईल. मलाही चांगले सूत्रसंचालन करता येईल. मीही चांगल्या प्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करू शकेन. पण हे स्वप्न प्रत्यक्षात येत नाही. कारण तसे मार्गदर्शन कुठे मिळत नाही. मग ती इच्छा तशीच मरून जाते आणि आपले आयुष्य सरून जाते...! याचाच विचार करून विश्व मराठी परिषदेने वक्तृत्व आणि संवादकौशल्ये, सूत्रसंचालन आणि कार्यक्रमांचे आयोजन या ऑनलाईन अभ्यासक्रमाची आखणी केली आहे. 15 वर्षावरील सर्व वयोगटांना डोळ्यासमोर ठेवून हा अत्यंत उपयुक्त असा अभ्यासक्रम तयार केला आहे. ​ या अभ्यासक्रमात काय शिकाल ? वक्तृत्वाची कला, सभाशास्त्र, व्याख्यानाची पूर्वतयारी, तयारीची साधने, विषयाची निवड, भाषणाचे नियोजन, सराव, रूपरेषा, भाषणाचे टिपण, भाषणाची प्रभावी सुरुवात, विषाची मांडणी, मुख्य गाभा, भाषणाचा विकास, श्रोत्यांशी संवाद, प्रत्यक्ष भाषण, पायाभूत कौशल्ये, कौशल्यविकास, आवाहनक्षमता, देहबोलीचे महत्व, सादरीकरण, संवाद म्हणजे काय?, प्रभावी संवादाचे महत्व, संवादकौशल्ये, संवादाचे घटक, संवादाची प्रक्रिया, श्रवण आणि श्रवण कौशल्ये, आत्मविश्वास, सूत्रसंचालन, प्रभावी सूत्रसंचालनाचे विविध पैलू, सूत्रसंचालनाचे नियोजन, टिपण, उत्तम सूत्रसंचालनाची वैशिष्ट्ये, कार्यक्रमांचे कुशल आयोजन, व्यासपीठ नियोजन इत्यादी. ​

  • मार्गदर्शक :

या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शक आहेत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी.

ख्यात वक्ते, लेखक, ज्येष्ठ कवी, संवाद-माध्यम तज्ज्ञ, समीक्षक, संपादक, विचारवंत, स्तंभलेखक, जनसंवाद विद्या विभागाचे विद्यापीठातील माजी विभागप्रमुख, चळवळीतील धडाडीचा कार्यकर्ता असे विविध आयाम त्यांच्या व्यक्तिमत्वाला  लाभले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष असताना व त्या अगोदरही संमेलनाचे कार्यवाह म्हणून त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे केलेले संग्रह व अन्य प्रकारचे लेखन प्रकाशित असून अनेक व्याख्यानमाला, कार्यक्रम, चर्चासत्रे, परिसंवाद, परिषदांचे, संमेलनांचे स्वत: आयोजक तसेच अध्यक्ष, मार्गदर्शक, व्याख्याते राहिले आहेत. अत्यंत ऋजू व्यक्तिमत्व, आत्मीय मार्गदर्शक आणि विद्यार्थी, वाचक, श्रोत्यांविषयी कळकळ, कार्याविषयी तळमळ ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची काही वैशिष्ट्ये आहेत.

IMG_20220326_113945_edited.jpg

या अभ्यासक्रमात आपण काय शिकाल ?

Salal hindi 2 (1)_edited.jpg
  • वक्तृत्वाची कला, सभाशास्त्र, व्याखानाची पूर्वतयारी, तयारीची साधने,

  • विषयाची निवड, भाषणाचे नियोजन, सराव, रूपरेषा,

  • भाषणाचे टिपण, भाषणाची प्रभावी सुरुवात, विषयाची मांडणी, मुख्य गाभा, भाषणाचा विकास, श्रोत्यांशी संवाद, प्रत्यक्ष भाषण,

  • पायाभूत कौशल्ये, कौशल्यविकास, आवाहनक्षमता, देहबोलीचे महत्व,

  • सादरीकरण, संवाद म्हणजे काय?, प्रभावी संवादाचे महत्व, संवादकौशल्ये, संवादाचे घटक, संवादाची प्रक्रिया,

  • श्रवण आणि श्रवण कौशल्ये, आत्मविश्वास,

  • सूत्रसंचालन, प्रभावी सूत्रसंचालनाचे विविध पैलू, सूत्रसंचालनाचे नियोजन, टिपण,

  • उत्तम सूत्रसंचालनाची वैशिष्ट्ये, कार्यक्रमांचे कुशल आयोजन,

  • व्यासपीठ नियोजन इत्यादी.

Ancient Background.jpg

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

  • वक्तृत्व म्हणजे काय ते जाणून घेता येणे

  • भाषणाचे नियोजन ,रूपरेषा , विकास कसा करावा  ते लक्षात येणे

  • प्रभावाची साधने, देहबोली, सादरीकरण यांचे महत्व लक्षात येणे

  • प्रभावी वक्त होण्यासाठीची स्वतःची तयारी आत्मविश्वासाने करता येणे

  • यशस्वी व्याख्याता होण्यासाठी सिद्ध कसे व्हावे हे कळणे

  • संवाद,संवाद कौशल्ये यांचा परिचय घडणे

  • उत्तम सूत्रसंचालक होण्यासाठीची तयारी

  • कार्यक्रमांचे कुशल,कल्पक आणि यशस्वी आयोजन करता येण्याची तयारी

  • व्यासपीठ नियोजन करता येणे

  • वक्तृत्वातून व्यक्तिमत्व विकास साधणे

अभ्यासक्रम - नियम व अटी 

१) स्त्री/पुरुष सर्वांना प्रवेश. वयोमर्यादा: वय  वर्षे 15 पासून पुढे.
२) अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने झूम (zoom application) द्वारा होईल.

३) परिस्थिती अनुकूल असल्यास व मार्गदर्शकांना शक्य असल्यास पुणे येथे दोन दिवसांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन व सादरीकरण शिबीर होईल. (मात्र प्रवास-निवासाची व्यवस्था नसेल.

४) असे सत्र असल्यास सत्राच दिवशी अल्पोपहार, चहा व दुपारचे भोजन याची सोय असेल.

५) वेळापत्रकामध्ये परिस्थितीप्रमाणे बदल करण्याचे अधिकार आयोजक, मार्गदर्शक यांना असतील.

६) अभ्यासक्रमाचे संपूर्ण शुल्क एकत्रित अथवा दोन हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा

७) एकदा केलेली नोंदणी कोणतही कारणाने रद्द करता येणार नाही. तसेच भरलेली रक्कम परतही केली जाणार नाही. मात्र वर्ग सुरु होण्याच्या चार दिवस अगोदर काळविल्यास बदली व्यक्ति देता येईल.

८) संपूर्ण माहिती व वेळापत्रक वाचल्यावरच नोंदणी करावी.

९) ऑनलाईन मार्गदर्शन - ऑनलाईन चाचणी, परीक्षा

१०) अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

११) न्यायालयीन सीमा : सर्व प्रकारच्या तक्रारी, दावे यासाठी न्यायालयीन सीमा ही पुणे शहर न्यायालयीन सीमा राहील.

सहभागी शुल्क (रेकॉर्डिंग सह)

भारतातील सहभागींसाठी : रु. 12,000/- फक्त

भारताबाहेरील सहभागींसाठी : USD 200 फक्त

नोंदणीची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2022 

नोंदणी कशी करावी ? 

1️⃣ खालील नोंदणीचे बटण क्लिक करा आणि नोंदणी अर्ज भरा.

2️⃣ अर्ज सबमिट झाल्यावर पेमेंट चे प्रकार दिसतील. ऑनलाईन किंवा बॅंकेत ट्रान्सफर करुन रक्कम जमा करा.

3️⃣ ऑनलाईन केल्यास त्वरित पोच ईमेलवर मिळेल. बॅंकेत जमा केल्यास त्याचे डिटेल्स आमच्या व्हॉट्सअ‍ॅप वर कळवावे.

4️⃣ अभ्यासक्रम सुरु होण्याच्या २४ तास अगोदर ऑनलाईन वर्गाची लिंक आणि इतर माहिती कळवली जाईल.

Payment Options Available: Online - Debit/ Credit Card, Internet Banking, UPI / Wallets OR Bank Transfer

चौकशी / माहितीसाठी संपर्क :

मो: 7507207645/ व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262/ फोन: 020-25534601

(सोम ते शनि - सकाळी १०:३० ते सायं. ८ वा.)

ईमेल: sampark@vmparishad.org

कीर्तनविश्व कार्यालय : द्वारा: विश्व मराठी परिषद - ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, हनुमान चौक, डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४

bottom of page