top of page

विश्व मराठी परिषद आणि भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज आयोजित

​अमेरिकेतील मराठी बांधवांसाठी

स्तोत्रपठण 

ऑनलाईन अभ्यासक्रम

BHISHMA Logo.jpg
भीष्म इंडिक फाउंडेशन 
विश्व मराठी परिषद.jpg
विश्व मराठी परिषद

चार महिन्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम

रोज ९० मिनिटे - १२ ऑगस्ट ते २३ नोव्हेंबर २०२३

दर शनिवारी-रविवारी | प्रत्येकी दीड तास | Zoom द्वारे

 

 आचार्य : सोमयाजी सुहोता आपटे, अग्निहोत्री 

आपटे कुटुंबाला २०० हून अधिक वर्षांची पौरोहित्य आणि याज्ञिकीची परंपरा

महासोमयाग फेब्रुवारी २०२३ चे मुख्य यजमान

 

एक उत्तम करियर संधी | आंतरराष्ट्रीय ऍक्रिडिएशन प्राप्त अभ्यासक्रम 

12 वर्षापुढील सर्व महिला व पुरुषांना मुक्त प्रवेश

​​उजळणीसाठी सर्व अभ्यासवर्गांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार आहे

सनातन भारतीय वैदिक हिंदू संस्कृतीमध्ये स्तोत्रपठण हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. मग तो मुलगा असो की मुलगी ! अगदी बालपणापासून पठणाचे संस्कार मुलांवर केले जात असत. त्यामध्ये जात्यावरील ओव्यांपासून, विविध प्रकारची स्त्रोत्रे, मंत्र, भजने ते अगदी दैनंदिन व्यवहारातील गणितातील उपयुक्त अशी पावकी, निमकी, अडीचकी असे पाठांतर करून घेतले जात असे. काही प्रमाणात त्याची सक्ती केली जात असे. मात्र त्यानंतर मुलांना त्याची गोडी लागत असे. विशेषता: पहाटेच्या वेळी नि:शब्द वातावरणामध्ये शांततेचा अनुभव घेत असतात अत्यंत शुद्ध वाणीने स्त्रोत्र मंत्राचा उच्चार एका वेगळ्या प्रकारची अनुभूती अतिव आनंद मिळवून देत असे. खरेतर यात वैज्ञानिक सत्य दडलेले होते. आजचे आधुनिक विज्ञान आपल्याला सांगते की व्हायब्रेशन्स म्हणजेच विश्व व्यवहार आहे. ध्वनी तरंग आणि त्याच्या फ्रिक्वेन्सी मानवी मनावर आणि शरीरावर मोठा परिणाम घडवून आणतात. विशिष्ट पद्धतीने स्त्रोत्र, मंत्राचे मोठ्याने उच्चारण केल्यावर मेंदूतील विविध घटकाच्या प्रक्रिया कार्यन्वित होतात. त्याचप्रमाणे त्या सुखद अनुभूतीमधून शरीराच्या विविध क्षमता विकसित होतात. रोगप्रतिकार शक्ती विकसित होते. सुश्रुत संहितेमध्ये कल्प स्थानामध्ये असे म्हटले आहे की औषधांपेक्षा अनेकदा मंत्र जास्त उपयोगी पडतात. खरतर मंत्र थेरपी आणि मंत्रोपचार ही एक उपचार पद्धती आहे. मात्र काळाच्या ओघात ती नामशेष झाली. आरोग्य विज्ञानाने आता दाखवून दिले आहे की अल्झमायर, कर्करोग, बी.पी. इत्यादी सायकोसोमॅटिक आजारांमध्ये स्त्रोत्रांचे, मंत्राचे पठण आणि संगीत उपचार यांचा चांगला उपयोग होतो. आत्ताच्या काळात स्तोत्रपठणाची माहिती व्हावी आणि किमान काही स्त्रोत्रे सर्वांना पाठ असावीत, म्हणून स्त्रोत्रपठण हा ऑनलाईन अभ्यासक्रम आयोजित केला आहे. यामध्ये एकूण २७ स्तोत्रे शिकवली जाणार आहेत. यातील काही स्तोत्रे अगदी लहान म्हणजे दोन ते चार श्लोकांची आहेत काही मोठी आहेत. सर्वांसाठी उपयुक्त अशी ही स्तोत्रे आहेत. लहान मुलांसाठी, बालक आणि युवकांसाठी श्री शारदा सरस्वती - प्रज्ञावर्धन स्तोत्र हे प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी रचले आहे. ते शिकवले जाणार आहे. ते शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासात तसेच बुद्धिवर्धनासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

स्तोत्रपठण अभ्यासक्रमामध्ये शिकवली जाणारी स्तोत्रे हे विविध देवतांची स्तोत्रे आहेत. त्यामध्ये गणेश, सरस्वती, विष्णू, शंकर, देवी, अन्नपूर्णा, लक्ष्मी, ज्योतिर्लिंगे, सप्तर्षी, इ. देवतांच्या स्तोत्रांचा समावेश आहे. अगदी दारिद्रय हरणापासून ते बुद्धी, ज्ञान प्राप्ती होणे, श्रेयस आणि प्रेयस आणि सर्व प्रकारची आधिभौतिक आणि आधिदैविक सौख्ये आणि समृद्धी प्राप्त व्हावी, सर्व प्रकारची घोर संकटे दूर व्हावीत अशी फलश्रुती देणारी ही स्तोत्रे आहेत. या स्तोत्रांचा आणि त्यांच्या नियमित पठणाचा आपल्या वैयक्तिक आरोग्यासाठी आणि सर्व प्रकारच्या अभिवृद्धीसाठी तर उपयोग होतोच त्याचबरोबर आपल्या सभोवतालचे वायुमंडल शुद्ध होते. आपले कौटुंबिक जीवन समृध्द होते. स्तोत्रपठण म्हणजे भारतीय संस्कृती, कुटुंबसंस्था आणि आनंदी जीवन यांना साधणारा दुवा आहे.

शाळेतील विद्यार्थी, बाल आणि युवक - लहान वयातच कोवळ्या मनावर संस्कार केले तर ते दीर्घकाळ परिणाम घडवतात. त्यांचा प्रभाव टिकून राहतो. स्तोत्र पठण हा विद्यार्थी, बालक आणि पालक यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आणि तितकाच उपयुक्त असा अभ्यासक्रम आहे. स्तोत्र पठणात पारंगत झालेली मुले, युवा पुढे त्यांच्या आयुष्यातही निश्चित पराक्रम गाजवतील यात शंका नाही.

या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती (Brochure) व्हॉट्सअ‍ॅपवर मागवण्यासाठी 16503151128 या क्रमांकावर Stotrapathan असा मेसेज पाठवा.

स्तोत्रपठण अभ्यासक्रमात शिकवली जाणारी स्तोत्रे : 

1) गणेशपंचरत्नस्तोत्रम्
2) गणेशाष्टकम् 
3) गणपतिस्तवः 
4) गजाननस्तोत्रम् 
5) गजाननस्तोत्रम् 
6) विष्णोःषोडशनामस्तोत्रम् 
7) विष्णुदेवाष्टकम् आणि विष्णोरष्टनामस्तोत्रम्
8) घोरकष्टोधारण स्तोत्र
9) षट्पदीस्तोत्रम् 
10) हरिशरणाष्टकं 
11) शिवमानसपूजास्तोत्रम् 
12) दारिद्र्य दहन स्तोत्रम् 
13) शिव षडाक्षर स्तोत्रम् 
14) बिल्वाष्टकम् 
15) शिवरक्षा स्तोत्रम् 
16)देवी अपराध क्षमापान स्तोत्रम् 
17) भवानी अष्टकम् 
18) अन्नपूर्णा स्तोत्रम् 
19) निर्वाणदशकम् 
20) गुरुस्तुतिः 
21) द्वादश ज्योतिर्लिङ्ग स्तोत्रम् 
22) सप्त चिरञ्जीव स्तुतिः 
23) सप्तर्षी स्मरणम् 
24) सप्तपुरी स्मरणम् 
25) शिवाशिव स्तुतिः 
26) एकश्लोकी रामायणम् आणि एकश्लोकी भागवतम
27) प्रज्ञावर्धन शारदा सरस्वती स्तोत्र

Suhota Apte.jpeg

चौकशी / माहितीसाठी संपर्क :

रश्मी बर्वे - 1-650-3151128 (Call / WhatsApp)

Email: bhishmaindicusa@gmail.com

10685 Grapnel Place Cupertino CA 95014 USA

भारतातील कार्यालय :

मो: 7030411506 / व्हॉट्सअ‍ॅप: 9503864401

(सोम ते शनि - सकाळी १०:३० ते सायं. ८ वा.)

ईमेल: sampark@vmparishad.org

विश्व मराठी परिषद कार्यालय : ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, हनुमान चौक, डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४

bottom of page