top of page

अनिश्चित पाऊस व काही अपरिहार्य कारणांमुळे परिक्रमा पुढे ढकलण्यात येत आहे. 

maxresdefault.jpg

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली पासून राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वर मंदिरापर्यंत ५ रात्री आणि ६ दिवस अशी एकूण ६ दिवसांची साहित्य संस्कृती जागर परिक्रमा आयोजित केली आहे. आजच्या तरुणाईला खऱ्या भारताची ओळख होण्यासाठी प्रत्यक्ष खेड्यात जाऊन तेथील संस्कृती आणि लोक जीवन याची अनुभूती घेण्यासाठी आणि तेथील ग्रामस्थ बंधू भगिनी बरोबर मनमोकळा संवाद साधून खरा भारत जाणून घेण्याची संधी देणारी ही एक अनोखी परिक्रमा आहे. यातून इंडियाची भारताशी ओळख होईल. 

1) यामध्ये १८ ते ३५ वयोगटातील युवा बंधू भगिनीना प्रवेश असेल. सुमारे १२५ जणांना यामध्ये प्रवेश दिला जाईल. 

 २) निःशुल्क प्रवेश ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर  विश्व मराठी परिषदेतर्फे  आपली निवड झाल्याचे कळविण्यात येईल.

 

३) परिक्रमेदरम्यान रोजचे चालणे सुमारे १२ ते १५ किलोमीटर असेल. परिक्रमेदरम्यान प्रभानवल्ली हा छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि स्वराज्याला सर्वात जास्त महसूल देणारा सुभा, खोरनिनको येथील मुचकुंदी नदीचा उगम आणि धरण, बल्लाळेश्वर मंदिर , शिवकालीन गढी, वेरवली, लांजा, ओणी,  राजापूरची गंगा, उन्हाळे येथील गरम पाण्याचे झरे, इंग्रजांच्या वखारीचे अवशेष, प्राचीन धूतपापेश्वर मंदिर  इ. स्थळांना भेट देणार आहोत. निसर्गाच्या सानिध्यात डोंगर दऱ्यातून चालताना तळकोकणाचे अद्भुत सौंदर्य अनुभवायला मिळेल.

४) परिक्रमेमध्ये निवासाच्या ठिकाणी ( शाळा,आश्रम, मंदिर, गावकऱ्यांची घरे ) यामध्ये राहण्याची सामुदायिक (एकत्रित) स्वरूपाची व्यवस्था आहे. पुरुषांची स्वतंत्र आणि महिलांची स्वतंत्र अशी असेल. (स्नान व स्वच्छतेसाठी उपलब्ध सोयी सुविधा असतील त्याप्रमाणे आहेत )

5) निवासाच्या ठिकाणी आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी आणि प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर चर्चा, गप्पा-गोष्टी आणि विचारांची देवाण-घेवाण, ग्रामीण कलांचे सादरीकरण, ग्रामीण खेळ असा उपक्रम असेल. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे, ज्येष्ठ गझलकार म.भा. चव्हाण, लेखक अतुल कहाते, नीलिमा बोरवणकर असे काही प्रसिद्ध साहित्यिक / कलाकार परिक्रमेत सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत निसर्गरम्य परिसरात चालण्याची आनंददायी अशी ही संधी आहे.

6) निवासाच्या ठिकाणी आपले अंथरूण पांघरूण स्वतः आणायचे आहे. ताट, वाटी व्यवस्था आहे. चहा, नाश्ता आणि कोकणातील स्थानिक शाकाहारी साधे घरगुती भोजन अशी व्यवस्था आहे.

7) परिक्रमेला सुरुवात करण्यासाठी शुक्रवारी दिनांक २८ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजेपर्यंत साखरपा जि. रत्नागिरी येथे स्वखर्चाने पोहोचणे अपेक्षित आहे. पुणे ते साखरपा सशुल्क वाहन व्यवस्था करण्यात येणार आहे. तुम्ही स्वतः ही कोकण रेल्वे, बस / इतर वाहनाने तिथे पोहचू शकता. एसटीने साखरपा हे स्थानक तर  रेल्वेने येण्यासाठी विलवडी हे जवळचे ठिकाण आहे. कोकणकन्या आणि तुतारी या रेल्वेगाड्या विलवडी स्थानकावर थांबतात. तिथून प्रभानवल्ली हे अंतर २० किमी. आहे. रिक्षा जीप अशी वाहने उपलब्ध असतात. 

8) सर्वात महत्त्वाचे - परिक्रमा झाल्यावर प्रत्येक सहभागी व्यक्तिला सुमारे २००० शब्दांमध्ये परिक्रमेतील अनुभवांवर आधारित प्रवासवर्णन, लेख, कथा अशा प्रकारचे साहित्य लिहावे अशी अपेक्षा आहे. हे लेखन विश्व मराठी परिषदेतर्फे प्रकाशित केले जाईल. 

9) या उपक्रमाचे आयोजक विश्व मराठी परिषद ही संस्था असून अखिल भारतीय साहित्य परिषद आणि इतर काही संस्था सहकार्य करीत आहेत. 

10 ) परिक्रमेमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणीची अखेरची तारिख १५ ऑक्टोबर २०२२ ही आहे.

नोंदणी बंद 

चौकशी / माहितीसाठी संपर्क

अपूर्वा राऊत - 9309462627 | स्वाती यादव - 9673998600

( कृपया सकाळी ११ ते सायंकाळी ७ या दरम्यान कॉल करावा )

bottom of page