काम नाही दाम नाही
रिकामा कुठवर फिरणार
उपेक्षित म्हणून जगणारा
हाच तो सुशिक्षित बेरोजगार १
प्रतिकूलतेवर मात करून तु
उच्च शिक्षित झाला ,
पण बदनशीब तुझे
साधा चपराशी नाही झाला २
नोकरीची अपेक्षा करू नको
ती तुला मिळणारच नाही
नोकरीचे स्वप्न पाहशील तर
भंगल्याशिवाय राहणार नाही ३
मोल आहे ज्याच्याकडे,
तोच खरा नशीबवान आहे.
तुझ्यासारखा शिकला सवरला
एक नंबरचा कमनशिब आहे ४
धीर सोडू नको मित्रा,
यातही एक मार्ग आहे
रोजगाराच दे सोडून
आपल्यासाठी स्वयंरोजगार आहे. ५
कवी: सुपराव रामराव घोंगटे (आव्हा ता.मोताळा ,जिल्हा बुलढाणा)
मो: ७४९९९००८९४
ईमेल: supraoghongate@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.
Comments