(सौ.सुषमा राम वडाळकर)
केला अभ्यास,दिल्या परीक्षा, वाढल्या आकांक्षा, न संपल्या अपेक्षा. झाले शिक्षण, मिळाली पदवी, अन् मोठ्या पदावर मोठी नोकरी.
जीवन माझे मार्गी लागले, साहित्य संस्कृती मागे राहिले.
लेखनाचे काय,असे विचारता? नाके नऊ येतात नोकरी करता करता.
कामाचा येतो रोजच वीट, कथा कविता वाचू कश्या नीट?
वाचनाला तर मुळी वेळच नाही, भ्रामिक सांत्वन करतो आम्ही.
पर अ़ंतर्मनाला विचारले नाही, "काय आवडते", शोधिले नाही.
आठवली असतीस आजीची ओवी वा आईने म्हंटलेल्या गीतेच्या ओळी.
आजोबांनी केलेले पोथीचे पारायण वा बाबांनी सांगितलेले ," रामायण".
शूर शिवबाच्या सामर्थ्याशी नाळ तुझी पण असे जुळलेली.
का विसरलास संतांची वाणी? जिचा गोडवा असे जिभेवरी.
बाळकडू हेच मिळाले तुजला, तू नाहीस रे ,असाच खुळा!
एकेक शब्द,प्रत्येक कथानक, कळत नकळत,तुझ्यात रूजले.
घे कलम, चल लिही अन् पहा कसे ते शब्दांत उमटले !
👍 कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
सौ. सुषमा राम वडाळकर (बडोदे)
मो: 9825032939
ईमेल: sushamavadalkar@gmail.com
नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.
Yorumlar