(कवयित्री: रोहिणी कुलकर्णी)
काळोखाच्या घट्ट मिठीत
पहाटेने स्वप्न पांघरली,
चांदणे निद्रिस्त होता
बघपहाटजागी झाली.
ओसरली दाटी धुक्याची
रातराणी ही मावळली,
देवळी काकड आरती होता
बघपहाटजागी झाली.
दवबिंदू अन् इवल्या तृणातून
सर्वदूरपहाटपसरली,
पक्ष्यांची किलबिल होता
बघपहाटजागी झाली.
फेसाळणार्या सागर किनारी
शांतता ही लुप्त झाली,
वृंदावनीचा दीप उजळता
बघपहाटजागी झाली.
विश्वाचा भार पेलण्यास
पुन्हा धरित्री सज्ज झाली,
रवीकिरणांचा स्पर्श जाहता
बघपहाटजागी झाली.
रोहिणी कुलकर्णी (ठाणे)
मो: ९८१९७५५९१९
ईमेल: rokul.rk@gmail.com
Comments