(कवयित्री: सुप्रिया लाड)
होती ती आई शिवबाची
होती स्त्री असामान्य कर्तृत्वाची
कणखर, समर्थ अन् धोरणी
खर् या अर्थाने ती जगत्जननी ।।१।।
स्वराज्य निर्माणात वाटा सिंहाचा
मराठा सरदार ‘पत्नी ते राजमाता’
प्रवास नव्हता सहज सोपा
स्वबळावर तिने सार्थ केला ।।२।।
शहाजी, शिवाजी, संभाजी
३ पिढ्यांना साथ मोलाची
अस्मिता जपली घराण्याची
शान राखली मराठी साम्राज्याची ।।३।।
घडवला स्वराज्य संस्थापक
घडवला सुराज्य संरक्षक
उत्तम मार्गदर्शक अन् प्रशासक
मातृत्व तिचे आहे प्रेरक ।।४।।
बहुगुणी ती आदर्श माता
आहे तिची अजरामर गाथा
ठायी तिच्या अलौकिक सहिष्णूता
तिच्या चरणी ठेवीते मी माथा ||५।।
सुप्रिया लाड, मुंबई
मो: 9619680177
ईमेल: supriya.rewadekar@gmail.com
Comments