top of page

आयुष्याशी भेटायाला (गझल)

(कवि: नरेन मून)


आयुष्याशी भेटायाला पुन्हा एकदा जावे म्हणतो

झाले गेले विसरावे अन दोषी मज ठरवावे म्हणतो

गहाण पडल्या मानवतेचे मुद्दल सारे फिटले आहे

व्याज तेवढे शिल्लक दिसते ते सुद्धा फेडावे म्हणतो

माझे माझे म्हणता म्हणता जगणे माझे अवघड झाले

दुसऱ्यासाठी किंचित जगलो असेच पुढे जगावे म्हणतो


शेतीखातर जगतो आणिक शेतीखातर मरतो आहे

पोशिंदा मी सर्व जगाचा चटणी भाकर खावे म्हणतो


मानवतेच्या पाठीवरती अन्यायाचे ओझे आहे

एकजुटीने मिळून सगळे ते ओझे उचलावे म्हणतो


समतेचे स्वर कानी पडता मन माझे मोहरले जाते

गाता गाता स्वरात त्यांच्या स्वर माझे मिळवावे म्हणतो


👍 गझल आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.


नरेन मून , वर्धा

मो: 9021626930

narenmoon1850@gmail.com


 

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.

241 views1 comment

Recent Posts

See All

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज, वंशज, जनता, जनक, जननी, तनुज, तनुजा, अग्रज, अग्रजा, वगैरे शब्द घड

टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page