पंढरी वारकऱ्यांचे केंद्र आहे. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल आहे. भक्ती हा ईश मार्ग आहे .बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल , करावे विठ्ठल मार्ग आहे. जिंही हृदय मंदिरी हे साध्य आहे. वारकरी भक्ती ची चळवळ आहे. चळवळ म्हणजे पुढे जाणे प्रगती करणे होय. संत व साहित्य वाटाडे आहेत. मानसाला ईश्वर ,संत नाही तर माणसास मानुस बनवते. वारकरी संप्रदायिक चळवळ हि वारीरूपात नित्य व चेतना आहे. अज्ञान नाश करून ज्ञान करणे,अंधश्रद्धानिर्मूलन करून श्रध्दा, दुख निवृत्ती करून आनंद प्राप्ती, असत्य कडून सत्याकडे, जडत्व कडूनचैतन्य, दुखाकडून सुख शांती आनंद देते .
अशी पंढरी, अशी चंद्रभागा, असे वारकरी, अशीवारी, असा देव, असा नामघोष सांगा कोठे आहे ?
अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. संपूर्ण जगच पवित्र भूमी आहे, शरीर पवित्र व पावनआहे. पावन शरीरानेच पावन करता येते. वारकरी व शेतकरी एकच आहेत. शेतकरीचा धर्म वारकरी आहे. वारकरी संप्रदाय नाही धर्म आहे. शेती शेतकरीची पावन भुमी आहे. मशागत उपासना असून भाकरी हा प्रसाद आहे. विठ्ठलानेही शेतकरी वर्गालाच विविध रूपाने मदत केली आहे.
न लगती सायास जावे वनांतरा! सुखे येतो घरा नारायण.!! वारी म्हणजे वारकरी व वारकरी म्हणजे वारी.
वारकरी वारी आनंदवारीआहे. भक्ती, ज्ञान, प्रेम, वारी आहे. आनंदे निर्भर डुल्लतसे. पंढरी तिर्थ एक वेळ जरी पाहिले तरी अनेक तिर्थक्षेत्र घडते. यांची महती संतानी सांगितली आहे. वारकरीचे विठ्ठल हेच भांडवल आहे.
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी ऊचारा. हेच संतानी सोपे सांगितरले आहे.परंतु आता हा वरपांगी पसारा दिसतो. मनीं शुध्द भावाचा आभाव दिसतो. तर वरकरणी धन असावे पोटी यांसाठी पुरूषार्थ हा आर्थाअर्थी होत आहे. सोंग साधन साधूचे नसते. शिगेला चाललेली अध्यात्माची वाट भजन हे उद्योग होऊ नाहीत आहे. पोटासाठी संत झाले कलित बहुत. तरी पण हेत चांगले आहे. संत हे सत्य असतात.
काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती!! यासाठी, होय होय वारकरी! पाहे पाहे रे पंढरी!!
कमेंट करा, शेअर करा.
प्रल्हाद म्हस्के (सावरगाव)
मो. 9049006474
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.
Comments